---Advertisement---

आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर मायकेल वॉनने घेतला भारतीय संघाचा समाचार; म्हणाला, ‘त्यांना एकदिवसीय विश्वचषकही…’

On: शुक्रवार, डिसेंबर 29, 2023 12:33 PM
Indian-Cricket-Team
---Advertisement---

सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर भारतीय संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानेही भारताच्या या पराभवावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही वर्षातील रेकॉर्ड पाहिल्यास भारतीय संघाला काहीही साध्य करता आलेले नाही, असे तो म्हणाला. मायकेल वॉनच्या मते, भारताची कामगिरी कमी झाली आहे.

सेंच्युरियन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तीन दिवसांत भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. केएल राहुल (KL Rahul) याच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा केल्या आणि 163 धावांची आघाडी घेतली. मात्र, प्रत्युत्तरात भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ 131 धावा करून सर्वबाद झाला. शेवटच्या सत्रात भारताने सात विकेट्स गमावल्या आणि केवळ 69 धावा जोडल्या. त्यामुळे भाारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

मायकल वॉन (Michael Vaughan) सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेत समालोचन करत असून येथे त्याने फॉक्स क्रिकेटवरील संभाषणात भारतीय संघाच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “भारत हा जगातील एक क्रीडा संघ आहे ज्याने गेल्या काही वर्षांत फार चांगली कामगिरी केली नाही. त्यांचे रेकॉर्ड बघितले तर त्यांना एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यांनी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती पण त्यानंतर आयसीसी स्पर्धा असो की दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना एकदिवसीय विश्वचषकही जिंकता आला नाही.” (Michael Vaughan takes notice of Indian team after defeat against Africa Said Even the ODI World Cup for them)

हेही वाचा

Team India Penalised: भारताला धक्क्यावर धक्के! ICCची मोठी कारवाई, आख्ख्या संघाला ठोठावला दंड
INDW vs AUSW: कर्णधार हरमनला खटकली टीम इंडियाची ‘ही’ गोष्ट, पराभवानंतर वाचून दाखवला चुकांचा पाढा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---