---Advertisement---

अरेरे! इंग्लिश फलंदाजाचा कसोटी मालिकेत तीनवेळा भोपळा, आता होणार संघातून बाहेर?

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेली कसोटी मालिका भारतीय संघाने ३-१ ने मालिका जिंकली आहे. तसेच भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यातील कामगिरी वगळता इतर तीन सामन्यात इंग्लंड संघाच्या फलंदाजाना आणि गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. अशातच माजी इंग्लंड कर्णधाराने जॉनी बेअरस्टो बद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर असताना जॉनी बेअरस्टो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत होता. पहिल्या २ सामन्यात त्याला निवडण्यात आले नाही. परंतु अखेरच्या २ सामन्यात त्याला संधी मिळूनही साजेशी कामगिरी केली नाही. २ सामन्यातील ४ डावात ते ३ वेळा शून्य धावांवर बाद झाला. तर चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावाक अवघ्या २८ धावा करु शकला.

अशातच इंग्लंड संघाचे माजी कर्णधार माइकल वॉन यांनी बेअरस्टोबद्दल म्हटले आहे की, “जॉनी बेअरस्टोचे या संघातून बाहेर जाणे निश्चित आहे. मला नाही वाटत की तो इंग्लंडमध्ये होणाऱ्या उन्हाळी हंगामात आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तसेच या मालिकेत काही सकारात्मक गोष्ट देखील घडल्या. कर्णधार जो रूट ,जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्स यांनी या मालिकेत चांगली कामगिरी केली.”

इंग्लंड संघाच्या निराशाजनक कामगिरीबद्दल वॉननी म्हटले…

इंग्लंड संघाने कसोटी मालिकेत अगदी निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळेच मायकल वॉन यांनी म्हटले, “इंग्लंड संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेट व्यतिरिक्त कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करावे. वर्षाच्या सुरुवातीला मर्यादित षटकांच्या मालिका नव्हे तर हे चार सामने इंग्लंड संघाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. भारतीय संघाने तीन कसोटी सामने जिंकले, त्यात इंग्लंड संघाला विजय मिळवण्याची संधी होती. परंतु भारतीय संघाने काही तासातच सामन्यात पुनरागमन केले.”

महत्त्वाच्या बातम्या-

माझ्या ग्लासमध्ये लिंबू पाणी असो अथवा…! रवी शास्त्रींचा ‘तो’ व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

‘किंग खान’च्या केकेआरची नजर तिसऱ्या विजेतेपदावर; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होणार लढत

एकवेळ क्रिकेट सोडण्याच्या विचारात असलेला रॉस टेलर, आता बनलाय सार्वकालिन महान फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---