---Advertisement---

आपण जर डिव्हिलीयर्स फॅन असाल तर ही आहे आपणासाठी आजची मोेठी बातमी

On: सोमवार, फेब्रुवारी 25, 2019 4:36 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलीयर्स या वर्षी जूलैमध्ये सुरु होणाऱ्या कौंटी क्रिकेटच्या टी20 स्पर्धेत मिडलसेक्स क्लबकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने या संघाबरोबर नुकताच करार केला आहे. याबद्दल येत्या आठवड्यात घोषणा केली जाणार आहे.

मागील मोसमात मिडलसेक्स त्यांच्या गटातील गुणतालिकेत तळात राहिला होता. त्यांना 2018 मध्ये त्यांच्या 14 सामन्यातील दोनच सामने जिंकण्यात यश आले होते. पण या मोसमासाठी डिव्हिलीयर्स त्यांच्या संघाशी जोडला गेल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डिव्हिलीयर्सने मागीलवर्षी मेमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला होता. पण त्याचबरोबर तो जगभरातील टी20 लीगमध्ये खेळत राहणार असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेत दक्षिण आफ्रिकाने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. या मालिकेत डिविलियर्सने 71.16 च्या सरासरीने 421 धावा केल्या होत्या.

डिव्हिलीयर्स येत्या आयपीएलमध्येही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणार आहे.

तसेच तो सध्या पाकिस्तान प्रीमियर लीग(पीएसएल) मध्ये लाहोर कलंदर्स संघाकडून खेळत आहे. तर त्याआधी तो जानेवारीमध्ये बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही रंगपूर रायडर्सकडून खेळला. त्याने यात ढाका डायनामाइट्सविरुद्ध खेळताना 50 चेंडूत नाबाद 100 धावाही केल्या होत्या.

डिव्हिलीयर्सने आत्तापर्यंत 272 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 35.86 च्या सरासरीने 7316 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 4 शतके आणि 48 अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

२००६ पासून टी२०मध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाला न जमलेला पराक्रम रैनाने आज केला

जसप्रीत बुमराह असा मोठा पराक्रम करणारा दुसराच भारतीय गोलंदाज

–टीम इंडियाने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अशी वाहिली श्रद्धांजली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment