संर्पूर्ण क्रीडाविश्वाला हादरवून टाकणारी दु:खद घटना १८ जून २०२१ रोजी घडली होकी. वाऱ्याला सुद्धा हरवतील इतकं जोरात ते पाळायचे. त्या महान व्यक्तीच नावे होते, ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग. याच भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांचा गतवर्षी १८ जून रोजी रात्री कोरोना संक्रमानामुळे मृत्यू झाला होता. दुर्दैवी बाब म्हणजे, १३ जून रोजीच त्यांची पत्नी निर्मल कौर यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते.
मिल्खा सिंग यांनी त्यांची जीवनसाथी निर्मल कौर यांना पहिल्यांदा १९५५ला श्रीलंकामधील कोलंबो येथे पाहिले होते. अगदी पहिल्या नजरेतच ते निर्मला यांच्या प्रेमात पडले होते. मिल्खा सिंग आणि निर्मला १९५५ साली कोलंबोमध्ये एका स्पर्धेसाठी गेले होते. त्यावेळी निर्मला या भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची कर्णधार होत्या आणि मिल्खा सिंग एथलेटिक्स संघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर दोघे एकमेकांशी बोलू लागले. त्यांच्या भेटी वाढत गेल्या.
मिल्खा सिंग यांनी निर्मला यांना भेटण्यासाठी हॉटेलचा पत्ता दिला होता. त्यावेळी काही साधन न सापडल्याने त्यांनी निर्मला यांच्या हातावरच तो पत्ता लिहिला होता. पुढे निर्मल यांनासुद्धा मिल्खा सिंग आवडू लागले होते. त्यांचे एकमेकांवर प्रेमही झाले. परंतु, निर्मला पंजाबी खत्री कुटुंबातून असल्यामुळे त्यांचा कुटुंबीयांना मिल्खा सिंग आवडत नसे. त्यामुळे तत्कालिन पंजाबचे मुख्यमंत्री प्रताप सिंग यांनी मिल्खा सिंग यांची प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला.
अखेर १९६२ रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. एका मुलाखतीमध्ये आपल्या प्रेमकहानीबद्दल मिल्खा सिंग यांनी सांगितले होते की, “एक खेळाडूच्या जीवनात एखादा तरी प्रेम येतचं. त्या खेळाडूला प्रत्येक स्थानावर एक प्रेम मिळते. माझ्या आयुष्यात ३ मुली आल्या. मला तिघींसोबत प्रेम झाला. पण, लग्न मात्र निर्मल कौरसोबत केले.”
मिल्खा सिंग यांचा खडतर प्रवास
मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी, पाकिस्तानच्या गोविंदपुरामध्ये झाला होता. त्यांचा जन्म एक सिख राठोड कुटुंबात झाला होता. मिल्खा सिंग यांना १४ भावंडे होती. त्यापैकी काही भावंडांचा लहानपणीच मृत्यू झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळेस त्यांनी आपल्या आई-वडिलांना, भाऊ आणि दोन बहिणींना आपल्या डोळ्या समोर जळताना पहिले होते. या अतिशय वाईट घटनेनंतर ते दिल्लीला पोहोचले. त्यांचे जीवन खूप संघर्षमय राहिले होते.
भारत आणि पाकिस्तानच्या फाळणी वेळेस त्यांनी आपल्या माणसांना गमावल्यांचे दु:ख त्यांना आयुष्यभर सतावत राहिले. फाळणीच्यावेळेस रेल्वेमध्ये महिला बोगीच्या सीटखाली लपून ते दिल्लीला पोहोचले आणि ढाब्यावर भांडी घासून त्यांनी आपले जीवन पुन्हा एकदा सुरु केले.
काही दिवसासाठी ते आपल्या बहिणीकडे दिल्लीला राहिले. त्यांनी आपल्या भावाच्या मलखान सिंगच्या सांगण्यावरून भारतीय सैनात दाखल होण्याचा निर्णय घेतला. चारवेळा प्रयत्न केल्यानंतर १९५१ला मिल्खा सिंग सैन्यात भरती झाले. त्यानंतर क्रॉस कंट्री धावण्याचा स्पर्धेत ते सहाव्या स्थानावर आले. या स्पर्धेनंतर त्यांना भारतीय सेनेने खेळामध्ये खास ट्रेनिंगसाठी निवडण्यात आला. त्यानंतर मेहनत करून मिल्खा सिंग एक धावपटू म्हणून नावारूपास आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvSA । मालिकेच्या निर्णायक सामन्याची खेळपट्टी कशी असेल?, वाचा एका क्लिकवर
VIDEO । चेन्नईच्या चाहत्यांचा नाद नाय राव!, भारताच्या सामन्यांतही घुमला सीएसकेचा जयघोष