-आदित्य गुंड
कामानिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरणे होते.अनेकदा एअरपोर्टला सेलेब्रिटी दिसत असतात.तसाच आज चेन्नई एअरपोर्टला मिलिंद सोमण दिसला.सेक्युरिटी चेकनंतर तो त्याच्या फ्लाईटसाठी गेटवर जात होता.तिथे पोहोचेपर्यंत दोन तीन जण त्याला थांबवून बोलताना दिसले.त्यांच्याशी बोलून मिलिंद गेटजवळ एक बाकड्यावर जाऊन बसला.
मिलिंदला मी इंस्टाग्रामवर फॉलो करतो. स्वतःच्या फिटनेसबाबत तो जागरूक असल्याचे त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरून लक्षात येते. त्याने बऱ्याच मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत आणि अतिशय अवघड अशी आयर्न मॅन ही शर्यत देखील पूर्ण केली आहे.आपल्या धावण्याचे फोटो तो इंस्टाग्रामवर टाकत असतो.स्वतः फिट राहण्याबरोबरच मिलिंद इतरांनी फिट रहावे म्हणूनही बरीच जागृती करत असतो.
एक सेलेब्रिटी म्हणून साहजिकच एअरपोर्टला बरेच लोक मिलिंदकडे बघत होते. तो बसल्यानंतर दोघातिघांनी जाऊन त्याला सेल्फीसाठी विनंती केली. एरवी बरेच सेलेब्रिटी आपल्या चाहत्यांना सेल्फी काढू देतात.मिलिंदबरोबर सेल्फी काढणं मात्र इतकं सोपं नाही. त्याच्याबरोबर सेल्फी काढायची असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागते.मिलिंद तुम्हाला पुशअप्स काढायला सांगतो.त्याने सांगितले तेवढे पुशअप्स काढले तरच तो तुमच्याबरोबर सेल्फीसाठी राजी होतो.चेन्नई एअरपोर्टला ज्या लोकांनी त्याला सेल्फीसाठी विचारले, त्यांनाही मिलिंदने असेच २० पुशअप्स काढायला सांगितले.त्याने सांगितलेली अट ऐकून मात्र त्या लोकांनी त्याच्याशी फक्त हात मिळवून पळ काढणे पसंत केले.
वयाच्या ५२ व्या वर्षी स्वतः तंदुरुस्त असणाऱ्या मिलिंदने सेल्फी बहाद्दर लोकांना आटोक्यात ठेवण्यासाठी वापरलेली युक्ती मात्र चर्चेचा विषय ठरली.
आज सकाळी चेन्नईच्या मरिना बीचवर धावण्यासाठी गेलेल्या मिलिंदला तिथे देखील अशाच एक चाहत्याने सेल्फीसाठी विनंती केली. त्यालाही मिलींदने पुशअप्स काढायला लावून मगच सेल्फी दिली.त्याचा फोटो त्याने आज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/BjERCFiAA-c/?hl=en&taken-by=milindrunning
महत्त्वाच्या बातम्या-
–रैनाने आज तुफानी खेळी केली तर या विक्रमासाठी विराटला वर्षभर वाट पहावी लागणार!
-शिखर धवनला हा विक्रम करत धोनीला मागे टाकण्याची संधी
–वाचा- वेळा बदलल्या आहेत मग आजचा सामना नक्की आहे तरी किती वाजता?
–जर आजचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज पराभूत झाले तर….
–जर्सी भारताची असो की चेन्नईची, धोनी विक्रम करताना काही थांबेना!
–तब्बल ११ आयपीएल वाट पहावे लागले आणि अखेर काल तो विक्रम घडलाच!