---Advertisement---

टी२० विश्वचषक २००७ च्या फायनलमधील स्कूप शॉट पुन्हा टीव्हीवर पाहून मिस्बाह उल हकने दिली ‘अशी’ रिऍक्शन

On: बुधवार, नोव्हेंबर 17, 2021 3:44 PM
---Advertisement---

यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. तसेच बाबर आजमच्य्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने देखील अप्रतिम कामगिरी केली होती. पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अंतिम सामन्याचा आनंद घेत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता, की टेलिव्हिजनवर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना सुरू आहे. तसेच माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मिस्बाह उल हक, वकार युनूस, वाहब रियाज आणि फखर ए आलम हे देखील हॉटेलच्या रूममध्ये एकत्र या सामन्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

सर्वजण सामना पाहण्यात मग्न दिसून येत आहेत. परंतु सामना सुरू असताना जेव्हा मिस्बाह उल हकचा २००७ टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील मिस्बाहने मारलेला अखेरचा स्कूप शॉट दाखवला जातो. त्यावेळी वकार युनूस म्हणतात की, “काय करतोय मिस्बाह.” हे ऐकल्यानंतर मिस्बाह उल हक यांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य येतं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आयसीसी टी२० विश्वचषक २००७ स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी षटकातील तिसऱ्या चेंडूवर मिस्बाह उल हकने स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, याच चेंडूवर मिस्बाह उल हक बाद झाला होता आणि भारतीय संघाने जेतेपदावर आपले नाव कोरले होते.

उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर विजय
टी२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान संघाला पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाचे आव्हान संपुष्टात आले होते. पाकिस्तानने या स्पर्धेत सुपर १२ फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली होती. तर फखर जमानने नाबाद ५५ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाला २० षटक अखेर ४ बाद १७६ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून डेविड वॉर्नरने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर मॅथ्यू वेडने सलग ३ षटकार मारत नाबाद ४१ धावांची खेळी केली होती आणि ऑस्ट्रेलिया संघाला सामना जिंकून दिला होता. याशिवाय मार्कस स्टॉयनिसने महत्त्वपूर्ण नाबाद ४० धावांची खेळी केली होती.

ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले होते. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत करत पहिल्यांदाच टी२० विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत-न्यूझीलंड संघ टी२० मालिकेसाठी सज्ज; ‘अशी’ राहिलीये दोन्ही संघांची आमने-सामने कामगिरी

‘ही २००७ ची गोष्ट आहे…’, रोहितने द्रविडच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या पदार्पणाच्या आठवणींना दिला उजाळा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलला आयसीसीने दिले ‘हे’ मोठे पद, अनिल कुंबळेची घेणार जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---