Loading...

पाचव्या ऍशेस सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या खेळाडूला मिळाली संधी

उद्यापासून(12 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात द ओव्हल मैदानावर ऍशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आज(11 सप्टेंबर) 12 जणांचा संघ घोषित केला आहे.

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या 12 जणांच्या संघात अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शला संधी मिळाली आहे. मार्शने ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2018 मध्ये भारताविरुद्ध खेळला आहे.

मार्शला ज्यादाचा गोलंदाजी पर्याय म्हणून पाचव्या आणि शेवटच्या ऍशेस सामन्यासाठी संधी मिळाली आहे. तसेट ट्रेविस हेडला पाचव्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.

याबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन म्हणाला, ‘ट्रेविस हेड या सामन्यात खेळणार नाही कारण आम्हाला वाटते या मोठ्या कालावधीच्या मालिकेसाठी आम्हाला ज्यादाच्या गोलंदाजी पर्यायाची गरज आहे.’

तसेच मार्शबद्दल पेन म्हणाला, ‘मिशेल मार्शनेही कसोटीमध्ये दोन शतके केली आहेत. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की तो फलंदाजीतही चांगली कामगिरी करेल.’

Loading...

ऑस्ट्रेलिया आज घोषित केलेल्या 12 जणांमधून अंतिम 11 जणांचा संघ उद्या सामन्याआधी नाणेफेकीवेळी घोषित होईल.

या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया 4 सामन्यांनंतर 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे ही आघाडी कायम ठेवून 2001 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका जिंकण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

असा आहे पाचव्या ऍशेस सामन्यासाठी 12 जणांचा ऑस्ट्रेलिया संघ – 

डेव्हिड वार्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लॅब्यूशाने, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श, मैथ्यू वेड, टिम पेन (कर्णधार/यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, पीटर सिडल, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवुड

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

शेवटच्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा ११ जणांचा संघ; या मोठ्या खेळाडूला वगळले

विराट-रोहित वादाबद्दल कोच रवी शास्त्रींनी केले मोठे भाष्य, म्हणाले…

Loading...

डेव्हिड वॉर्नरबद्दल कूकने केला मोठा खूलासा, सांगितले कशाप्रकारे केली चेंडूशी छेडछाड

You might also like
Loading...