Loading...

विराट-रोहित वादाबद्दल कोच रवी शास्त्रींनी केले मोठे भाष्य, म्हणाले…

मागील अनेक दिवसांपासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये वाद असल्याची चर्चा होत आहे. पण हे सर्व मुर्खपणाचे असल्याचे म्हणते असे वाद नसल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी स्पष्ट केले आहे.

गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले, ‘मी मागील 5 वर्षे भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये आहे. खेळाडू कसे खेळले आहेत, तसेच त्यांनी संघाला नेहमी कशी मदत केली आहे आणि त्यांना त्यांची जबाबदारी काय आहे हे माहित आहे,  हे सर्व मी पाहिले आहे. त्यामुळे मला वादाच्या चर्चा  मुर्खपणाचे वाटते.’

‘मी त्यांच्याबरोबर आहे आणि मला ते कशाप्रकारे खेळतात हे माहित आहे. जर असे काही असते तर रोहितने विश्वचषकात 5 शतके का केली असती? विराट जे करत आहे, ते त्याने का केले असते? त्यांनी एकत्र भागीदारी कशी केली असती?’

त्याचबरोबर ड्रेसिंगरुममधील वातावरणाबद्दल शास्त्री म्हणाले, ‘संघात 15 खेळाडू असतात आणि प्रत्येकाचे विचांरामध्ये फरक असतो. त्याचीच गरज असते. मला वाटत नाही की सर्वजणांचा एकच विचार असावा.’

‘तूम्ही चर्चा केली पाहिजे आणि कोणीतरी कदाचीत वेगळा विचार घेऊन येईल जो प्रेरणादायी असेल. त्यामुळे तूम्ही खेळाडूंना अभिव्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे आणि मग सर्वोत्तम काय आहे, हे ठरवायला पाहिजे.’

Loading...

तसेच शास्त्री म्हणाले, या संघाला(भारतीय संघाला) मोठ्या गोष्टी करण्याची संधी आहे. वेस्ट इंडीजने 80 च्या दशकात तर ऑस्ट्रेलियाने 90 च्या दशकात ज्याप्रकारे वर्चस्व निर्माण तसा वारसा सोडण्याची या संघाकडेही संधी आहे आणि ते सध्या तसे करत आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या – 

डेव्हिड वॉर्नरबद्दल कूकने केला मोठा खूलासा, सांगितले कशाप्रकारे केली चेंडूशी छेडछाड

‘एक हजारी मनसबदार’ परदीप नरवालने प्रो कबड्डीत रचला मोठा इतिहास

…आणि भारताला नेहमीच नडलेल्या कूकने सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी दवडली!!

You might also like
Loading...