Loading...

शेवटच्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा ११ जणांचा संघ; या मोठ्या खेळाडूला वगळले

उद्यापासून(12 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात द ओव्हल मैदानावर ऍशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने अंतिम 11 जणांचा संघ जाहिर केला आहे.

या 11 जणांच्या संघात 21 वर्षीय सॅम करनला संधी मिळाली आहे. करनचा हा पहिलाच ऍशेस सामना असणार आहे. तसेच इंग्लंडच्या 11 जणांच्या संघात ख्रिस वोक्सनेही पुनरागमन केले आहे.

पण शेवटच्या ऍशेस सामन्यासाठी जेसन रॉय आणि क्रेग ओव्हरटोनला मात्र 11 जणांच्या संघात संधी मिळालेली नाही.

या मालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया 4 सामन्यांनंतर 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला या शेवटच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत पराभव टाळण्याचे आव्हान असणार आहे.

पाचव्या ऍशेस सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्यापासून दुपारी 3.30 वाजता सुरुवात होणार आहे.

Loading...

पाचव्या ऍशेस कसोटीसाठी असा आहे 11 जणांचा इंग्लंड संघ – 

जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, जो डेन्ली, जॅक लीच, बेन स्टोक्स, ख्रिस वॉक्स.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट-रोहित वादाबद्दल कोच रवी शास्त्रींनी केले मोठे भाष्य, म्हणाले…

डेव्हिड वॉर्नरबद्दल कूकने केला मोठा खूलासा, सांगितले कशाप्रकारे केली चेंडूशी छेडछाड

‘एक हजारी मनसबदार’ परदीप नरवालने प्रो कबड्डीत रचला मोठा इतिहास

You might also like
Loading...