इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधून मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र, आता तो ताज्या आरटी- पीसीआर चाचणीत निगेटिव्ह आला. त्यामुळे बुधवारी (दि. २० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स संघात खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या ३२व्या सामन्यावर कोणतेही संकट नाही. विशेष म्हणजे, दिल्ली संघाचे खेळाडू फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना सोडले, तर संघातील इतर सर्व सदस्य आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह आढळले आहेत. फरहार्ट हे कोरोनाच्या तावडीत सापडल्यानंतर क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत.
सर्व सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
भारतीय क्रिकेट नियामक संचालनाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. १८ एप्रिल) माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मिचेल मार्शची आरटी- पीसीआर चाचणी निगेटिव्ह आलीये. आरटी- पीसीआर चाचणीला निर्णायक मानले जाते. त्याच्याशिवाय इतर सर्व सदस्यांचा आरटी- पीसीआर चाचणीचा निकालही निगेटिव्ह आला आहे. दिल्ली आणि पंजाब यांच्यातील बुधवारच्या सामन्याला कोणताही धोका नाही.”
यापूर्वी मिशेल मार्शने (Mitchell Marsh) कोरोनाचे लक्षणे दिसल्यानंतर आरटी- पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यामागे असेही कारण असू शकते कारण त्याचे फरहार्ट यांच्या मार्गदर्शनाखाली रिहॅबिलिटेशन सुरू होते. तसेच, बारीक लक्षणे होती.
यापूर्वी बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले होते की, “दिल्ली कॅपिटल्सला आज पुण्याची यात्रा करायची होती. मात्र, संघातील सर्व सदस्यांना आपापल्या खोलीतच थांबण्यास सांगितले गेले. संघात कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव आहे की, नाही किंवा पॅट्रिक फरहार्ट सारखेच हे प्रकरण आहे का, हे शोधण्यासाठी आरटी- पीसीआर केले जात आहे.” संघाच्या मसाजरमध्येही कोव्हिड-१९ची लक्षणे होती, पण चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला.
प्रत्येक सदस्याची पाचव्या दिवशी चाचणी केली जाते
सूत्रांनी पुढे बोलताना सांगितले की, “सर्व संघ पुण्यातील कॉनरड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत, जिथे बीसीसीआयने बायो-बबल तयार केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने प्रवास करायचा होता, पण आता उशीर झाला आहे. साहजिकच ज्यांचा तपासात निकाल निगेटिव्ह येईल, ते उद्या पुढील प्रवासाला निघतील.”
बीसीसीआयच्या चाचणी प्रोटोकॉलनुसार, आयपीएल संघातील प्रत्येक सदस्याची संघाच्या बबलमध्ये दर पाचव्या दिवशी चाचणी केली जाते. शेवटच्या सत्रात ते दर तिसऱ्या दिवशी असायचे. याशिवाय, फ्रँचायझी आपल्या सदस्यांची चाचणी घेऊ शकते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दिल्ली संघाच्या एका सूत्राने सांगितलेले की, “आम्हाला आज इथून रवाना व्हायचे होते. मात्र, पुढील सूचना येण्यापर्यंत खोलीतच राहायला सांगण्यात आले आहे.”
आयपीएलच्या बायो-बबलच्या बाहेर कोव्हिड-१९ची प्रकरणे वाढत आहेत. बायो-बबलमध्येही कोरोना व्हायरसचे संकट वाढत आहे. मागील सत्रात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान स्पर्धा स्थगित करावी लागली होती. ही स्पर्धा मागच्या वेळी सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान यूएईमध्ये पार पडली होती.
मिचेल मार्शने आयपीएल २०२२च्या हंगामात फक्त १ सामना खेळला आहे. त्यात त्याने फक्त १४ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट
मानहानीकारक पराभवानंतर जडेजा झाला व्यक्त; म्हणाला, त्या कारणामुळे आम्ही हरलो