AUS vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. अष्टपैलू मिचेल मार्श याची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याच्याशिवाय मिचेल स्टार्क आणि स्टीव्ह स्मिथ हे टी-20 मालिकेत सहभागी होणार नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने टी-20 मालिकेसाठी संघात पुनरागमन केले आहे.
मात्र, यंदाच्या टी20 विश्वचषकात संघाची धुरा कोण सांभाळणार हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. पण मार्शकडे कमान मिळाल्यानंतर आता विश्वचषकासाठी कर्णधारपदाच्या दावेदारांमध्ये तो आहे असे मानता येईल. गेल्या वर्षी मॅथ्यू वेड भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. (mitchell marsh to captain australia against west indies maxwell returns cummins rested)
क्रिकबझच्या वृत्तानुसार, पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन संघाची जबाबदारी स्वीकारण्याची दाट शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत पॅट कमिन्सचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. या मालिकेमुळे टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची धुरा कोण घेणार हे स्पष्ट होईल. स्टार्क न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे.
स्टीव्ह स्मिथच्या जागी मॅट शॉर्टला संघात संधी देण्यात आली आहे. अलीकडेच शॉर्टने बिग बॅश लीगमध्ये 541 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरसह शॉर्ट सलामीला फलंदाजी करताना दिसणार आहे. तर ग्लेन मॅक्सवेल संघात परतला आहे. मॅक्सवेल याआधी वनडे मालिकेतून बाहेर झाला होता. वेगवान गोलंदाज नॅथन एलिसचेही संघात पुनरागमन झाले आहे. (Big change in Australian team Mitchell Marsh captain The return of the star all-rounder to the team)
वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ऍबॉट, जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा.
हेही वाचा
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन रामभक्तीत तल्लीन! हिंदीत पोस्ट लिहून सर्वांना केले चकित
भारतीय संघाचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ लवकरच संपेल, रवी शास्त्री यांनी केले भाकीत