भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. मालिकेतील भारतीत संघ 2-0 अशा आघाडीवर आहे. या कसोटी मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळली जाणार आहे. वनडे मालिकेतून ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन करत आहेत. मिचेल मार्श जरी संघात सामील झाला असला, तरी तो गोलंदाजी मात्र करणार नाहीये.
ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) पायाच्या फ्रॅक्चरमुळे मागच्या काही महिन्यांमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. मॅक्सवेलने चालू आठवड्यात शेफिल्ड शील्ड स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. विक्टोरिया संघासाठी खेळणाऱ्या मॅक्सवनने दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेल्या विजयात योगदान दिले. मैदानात पुनरागमन केले असले, तरी मॅक्सवेलच्या मते खेळण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता त्याला अद्याप मिळू शकली नाहीये. “शेफिल्ड शिल्ड सामन्यात फलंदाजी करत असताना मी शक्यतो मानसिक स्थितीत नव्हतो,” असे मॅक्सवेल म्हणाला.
“नेट्समध्ये तुम्ही मेहनत घेत असाल, पण मानसिकता पुन्हा मिळवणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. मी शक्यतो पुढच्या काही महिन्यांमध्ये यावर काम करणार आहे. साडे तीन महिने न खेळण्यानंतर मी निर्णय घेतला आहे की, वर्षाच्या शेवटी होणाऱ्या विश्वचषकाच्य (वनडे) आधी माझे कॅलेंडर क्रिकेटने भरून टाकायचे आहे. आम्हाला एकदिवसीय मालिका खेळायची आहे. भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्वाची असणार आहे.”
ऑस्टरेलिचा फलंदाजी अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) याला भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात निवडले गेले आहे. पण मार्श या मालिकेत गोलंदाजी करणार नसल्याचे त्याने स्वतः सांगितले आहे. “एका अष्टपैलू खेळाडूच्या रूपात कारकीर्द पुढे नेण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मी अजून गोलंदाजी सुरू केली नाहीये. त्यामुळे पुढच्या काही आठवड्यांमध्ये प्रदर्शनात सुधारणा होईल. एका फलंदाजाच्या रूपात खेळण्यासाठी मी तयार आहे, पण अष्टपैलू म्हणून खेळण्याची मला नेहमीच इच्छा असते. गोलंदाजीमुळे सामन्याची माजी भूमिका महत्वाची राहिते. जोपर्यंत शक्य असेल, तोपर्यंत अष्टपैलू म्हणून खेळत राहील.” दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला वनडे मालिका 17 मार्च रोजी सुरू होईल.
भारताविरुद्धच्या वनेड मालिकेसाठी निवडलेला ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍश्टन एगर, ऍलेक्स कॅरे, कॅमेरून ग्रीन, ट्रेविस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लॅब्युशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा. (Mitchell Marsh will not bowl in the ODI series against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘म्हणूनच बायको सोडून गेली’, धवन अन् बॉलिवूड अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट
“सिराजला गोलंदाजीतील विराट व्हायचेय”, माजी प्रशिक्षकांनी सांगितला तो किस्सा