---Advertisement---

आहा कडक! मिचेल स्टार्कच्या चेंडूने अलगद उडवली दांडी, गिरकी घेत दूरवर जाऊन पडला स्टंप

---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका अखेर समाप्त झाली आहे. वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सोमवारी (२६ जुलै) पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ६ गडी राखून विजय मिळवला तसेच ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. यापूर्वी झालेल्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलिया संघावर ४-१ ने विजय मिळवला होता. अशातच तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने असा काही चेंडू टाकला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आपल्या धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तो गोलंदाजीला आला की, फलंदाजांचा थरकाप उडत असतो. अशातच तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले होते. त्याने वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलला बाद करत तिसरी विकेट घेतली होती.

तर झाले असे की, वेस्ट इंडिजचा फलंदाज शेल्डन कॉट्रेल हा फलंदाजी करत असताना संघर्ष करताना दिसून येत होता. त्याला १२ चेंडूत एकही धाव करता आली नव्हती. त्यावेळी ४६ वे षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला होता. स्टार्कने उजव्या हाताच्या फलंदाजाला राऊंड द विकेट गोलंदाजी करत ऑफ स्टंपवर फूलटॉस चेंडू टाकला जो शेल्डन कॉट्रेलला कळालाच नाही. चेंडू ऑफ स्टंपला धडकताच तो स्टंप दूर जाऊन पडला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Mitchell starc bowled Sheldon Cottrell with a beautiful delivery)

या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज एविन लुईसने नाबाद ५५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. तसेच डॅरीन ब्रावोने १८ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ गडी बाद केले. वेस्ट इंडीज संघाचा डाव ४५.१ षटकात १५२ धावांवर संपुष्टात आला होता.

वेस्ट इंडिज संघाने दिलेल्या १५३ धावांचा पाठलाग करताना यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यु वेडने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तर ॲलेक्स कॅरीने ३५ धावांचे योगदान दिले. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला. तसेच ही आपली २-१ ने जिंकली.

महत्त्वाच्या बातम्या-

पृथ्वी शॉच्या इंग्लंडला जाण्याने ‘या’ दोघांवर वाढला दबाव, चांगली कामगिरी करण्याचे असेल आव्हान

‘आर्किटेक्ट म्हणून फॉर्मल शर्ट ते भारताची जर्सी, खास प्रवास होता’, पदार्पणानंतर वरुण चक्रवर्तीचे भावनिक ट्विट

पोलार्ड-गेलसारखे धुरंधर असूनही २६ वर्षांपासून वनडे मालिकेत विंडीज कांगारूंकडून खातोय सपाटून मार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---