भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान विश्वचषकातील पाचवा सामना रविवारी (8 ऑक्टोबर) खेळला जात आहे. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान आहे. या धावांचा बचाव करताना ऑस्ट्रेलियाला मिचेल स्टार्क याने पहिल्या षटकात यश मिळवून दिले. यासोबतच त्याने विश्वचषकात नवा विक्रम केला.
ऑस्ट्रेलियन संघाला फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे केवळ 200 धावांचा बचाव करताना त्यांना सुरुवातीपासून बळी घेणे आवश्यक होते. अनुभवी स्टार्क याने विश्वचषकातील पहिला सामना खेळत असलेल्या ईशान किशन याला पहिल्या चेंडूवर तंबूत धाडले. यासह त्याने वनडे विश्वचषकात बळींचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने केवळ 19 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. वनडे विश्वचषकात 50 बळी घेणार होतो पाचवा गोलंदाज ठरला. तसेच या सर्वांमध्ये त्याने सर्वात लवकर हे पन्नास बळी पूर्ण केले.
स्टार्क हा आपला तिसरा विश्वचषक खेळत आहे. यापूर्वी झालेल्या 2015 विश्वचषकात त्याने 25 बळी मिळवत स्पर्धेचा मानकरी होण्याचा मान मिळवलेला. त्यानंतर 2019 विश्वचषकातही त्याने 24 बळी टिपलेले.
वनडे विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅकग्रा याच्या नावे आहे. त्याने चार विश्वचषकात 39 सामने खेळताना तब्बल 71 बळी मिळवलेत. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन याने 5 विश्वचषकात मिळून 40 सामन्यात 68, लसिथ मलिंगाने 4 विश्वचषकात 29 सामन्यात 56 तर पाकिस्तानच्या वसीम अक्रम याने 38 सामन्यात 55 बळी मिळवले होते. या विश्वचषकात स्टार्क हे सर्व विक्रम मोडीत काढण्याचा प्रयत्न करेल.
(Mitchell Starc Complete 50 ODI World Cup Wickets)
महत्वाच्या बातम्या –
भारताची धसमुसळी सुरुवात! रोहित-ईशान आणि श्रेयस खातेही न खोलता तंबूत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेच्या वाट्याला अजून एक दुःख, आयसीसीच्या कावाईचा करावा लागणार सामना