भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना आज (6 डिसेंबर) सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाईल. मात्र, या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने कौटुंबिक कारणासाठी टी20 मालिकेतून माघार घेतली आहे.
क्रिकेट डॉटकॉम डॉट एयू या क्रीडा वेबसाईटने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबद्दल माहिती दिली आहे.
मिशेल स्टार्कबद्दल माहिती देताना ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी लिहिले की, “या जगात, कुटुंबापेक्षा अधिक महत्वाची इतर कोणतीही गोष्ट नाही.आम्ही मिशेलला लागणारा पूर्ण वेळ देऊ. त्याचा आणि त्याच्या कुटुंबासाठी योग्य वेळ आहे, असे जेव्हा त्याला वाटेल तेव्हा आम्ही त्याचे संघात पुन्हा स्वागत करू”
"There is nothing in the world more important than family … We will give Mitch all the time he needs and welcome him back into the squad with open arms whenever he feels the time is right for him and his family." – Justin Langer
— cricket.com.au (@cricketcomau) December 5, 2020
शुक्रवारी (4 डिसेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी20 सामना खेळला गेला होता. या सामन्यात मिशेल स्टार्कने 4 षटकांत 34 धावा देऊन 2 गडी बाद केले होते.
दुसऱ्या टी20 सामन्यात स्टार्कच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघ कशी कामगीरी करतो हे पाहावं लागेल.
भारताने पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला होता. या विजयासह भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात भारत मालिका विजयाच्या दृष्टीने मैदानात पाऊल टाकेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘जडेजाला ११ वर्षांनंतरही तितका सन्मान मिळत नाही’, माजी भारतीय खेळाडूने व्यक्त केली खंत
‘हा’ ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनला बुमराहचा ‘फॅन’, म्हणाला…