---Advertisement---

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! कोरोनामुळे स्थगित केलेली दक्षिण आफ्रिका- इंग्लंड वनडे मालिका होणार ‘या’ दिवसापासून सुरू

---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अनिश्चित काळासाठी स्थगित झालेली वनडे मालिका रविवारपासून (६ डिसेंबर) सुरू होणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिका संघातील एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही मालिका रविवारपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. उद्या केपटाऊन येथे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल.

इंग्लंड संघ आला आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

कोरोना महामारीनंतर प्रथमच इंग्लंडचा संघ कोणत्या तरी देशाच्या दौऱ्यावर गेला आहे. दक्षिण आफ्रिकेतील या दौऱ्यात तीन टी२० व तीन वनडे सामने खेळवले जाणार होते. त्यापैकी, टी२० सामन्यात पाहुण्या इंग्लंडने यजमान दक्षिण आफ्रिकेला ३-० अशा एकतर्फी फरकाने पराभूत केले.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची कोरोना चाचणी आली होती पॉझिटिव

टी२० मालिकेनंतर वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ केपटाउन येथील बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दौरा सुरू होण्याआधीही दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणारी वनडे मालिका रविवारपर्यंत स्थगित केली गेली होती. आज त्या खेळाडूची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने मालिका सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत दिली माहिती

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने अधिकृतरीत्या ट्वीट करत या घटनेची माहिती दिली. त्यांनी म्हटले, ‘आम्हाला सांगताना आनंद होत आहे की, दक्षिण आफ्रिका संघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. उद्यापासून वनडे मालिकेला सुरुवात होईल.’

शुक्रवारी खेळवला जाणार होता पहिला सामना

नियोजित कार्यक्रमानुसार वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (४ डिसेंबर) खेळला जाणार होता. त्यानंतर, ७ व ९ डिसेंबर रोजी उर्वरित दोन सामने खेळले जाणार होते. मात्र, आता रविवारी आणि सोमवारी सलग दोन सामने होतील. मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्त्व क्विंटन डी कॉक, तर इंग्लंडचे नेतृत्त्व ऑयन मॉर्गन करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; ‘हा’ खेळाडू टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता

“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”

‘…तर तुम्ही कन्कशन सब्स्टिट्यूट घेण्यास पात्र नाही’, भारतीय दिग्गजाची नव्या नियमावर नाराजी

ट्रेंडिंग लेख-

‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?

पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी

अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---