भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार पॅट कमिन्स मायदेशात परतल्यानंतर अष्टपैलू कॅणरून ग्रीन आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांचे सांघात आगमन झाले. मिचेल स्टार दुखातीच्या कारणास्तव भारताविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नव्हता. तिसऱ्या सामन्यात त्याने संघात पुनरागमन केले, पण दुखापत काही त्याची पाठ सोडताना दिसत नाहीये.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील हा तिसरा कसोटी सामना 1 मार्च रोजी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सुरू झाला. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही संघ पहिल्या डावात सर्वबाद झाले. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर मिचेल स्टार (Mitchell Starc) त्याच्या पहिल्याच षटकात दुखापतग्रस्त असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 197 धावा करून सर्वबाद झाला आणि भारतावर 88 धावांची आघाडी घेतली. तत्पूर्वी भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 109 धावा करून विकेट्स गमावल्या आहेत.
दुसऱ्या डावात भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला आले. यावेळी ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला. डावातील हे पहिले षटक असले, तरी स्टार्कच्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याचे दिसत होते आणि तरीदेखील तो गोलंदाजी करत होता. दुखापत झाली असतानाही गोलंदाजी केल्यामुळे सध्या सोशल मीडियावर स्टार्कची चर्चा होत आहे.
— Vaishnavi Iyer (@Vaishnaviiyer14) March 2, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी मॅथ्यू कुहनेमन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर नाथन लायनने तीन विकेट्स नावावर केल्या. तर भारतासाठी पहिल्या डावात रविंद्र जडेजा सर्वाधिक 4 विकेट्स घेऊ शकला. जडेजाच्या साथीने फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने तीन, तर वेगवान गोलंदाज उमेश यादव यानेही तीन विकेट्स घेतल्या. (Mitchell Starc’s finger was seen bleeding in the first over of the second innings of the Indore Test.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा दमदार खेळाडू सर्जरीसाठी न्यूझीलंडला होणार रवाना! आर्चरला फिट करणाऱ्या सर्जनला केलंय पाचारण
वडिलांच्या निधनानंतर 10 दिवसांच्या आत उमेश यादव भारतीय संघात, ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकण्यास पाडले भाग