---Advertisement---

मिताली राज आणि वडील बनले रिक्षाचालकांचे देवदूत, वर्षभरापासून ‘अशी’ करतायत भरघोस मदत

---Advertisement---

भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशावेळी अनेक परदेशी आणि भारतीय क्रिकेटपटूंनी देखील कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी जमेल तशी मदत केल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये आता आणखी एका महिला क्रिकेटपटूची भर पडली आहे.

भारतीय महिला क्रिकेटपचू मिताली राज ही देखील कोरोनाच्या कठीण काळात गेल्या एक वर्षापासून रिक्षा चालकांना मदत करत आहे. परंतु तिला हे कार्य सुरू ठेवता येणार नाहीये. कारण येत्या जून महिन्यात भारतीय महिला संघाला इंग्लंडचा दौरा करायचा आहे, ज्यामुळे ती सध्या मुंबईमध्ये विलगीकरणात आहे. तिच्या अनुपस्थितीत हे महान कार्य तिचे वडील सुरू ठेवणार आहेत. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियावर फोटोज् शेअर करत दिली आहे.

मिताली राजने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचे वडील रिक्षा चालकांना राशन वाटप करण्यासोबत पैसे आणि जीवनावश्यक गोष्टी देताना दिसून येत आहेत. फोटो पाहून असे दिसून आहे की, हे तिच्या घरातील फोटोज् आहेत.

तिने या फोटोला कॅप्शन देत लिहिले आहे की, “कोरोना व्हायरसच्या कठीण काळात माझे वडील, मिताली राज इनिशिएटिव्हद्वारे रिक्षा चालकांना पैसे आणि राशन देत आहेत. मी गेल्या वर्षी हा उपक्रम सुरू केला होता. परंतु आता माझ्या अनुपस्थितीत माझे वडील ही जबाबदारी घेत आहेत. इथे फक्त एकच समस्या आहे त्यांचा मास्क.”

मिताली राजच्या वडिलांनी मास्क घातला आहे. परंतु तो नाकाच्या खाली सरकला आहे. म्हणून तिने असे म्हटले आहे. तिने हाती घेतलेल्या या समाजकार्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले आहे. कोरोनाच्या कठीण काळात सर्वच जण अडचणीत आहे. यात रिक्षा चालकांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मितालीने हाती घेतलेल्या या कार्यामुळे त्यांना मदत झालीच असेल यात काही शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

चिन्नप्पापट्टी ते टीम इंडिया असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’

वाढदिवस विशेष! बॉलिवूडच्या ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख खान

‘या’ ३ हसीन अभिनेत्रींच्या प्रेमात होते ‘रवी शास्त्री’, पण त्यांची प्रेमकहाणी मात्र…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---