---Advertisement---

नवरोबांची फटकेबाजी पाहून नताशा, रितीका अन् पंखुडीची भन्नाट रिऍक्शन, तोंड राहिले खुलेच्या खुले; बघा फोटो

---Advertisement---

मंगळवारी (13 एप्रिल) रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळलेल्या सामन्याने सर्वांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. कोरोना विषाणूमुळे यंदाच्या मोसमात प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्यास बंदी असली तरी, खेळाडूंच्या घरच्या सदस्यांना आणि सामना अधिकाऱ्यांना कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करुन स्टेडीयमवर येऊन सामने पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे कोलकाता विरुद्ध मुंबईच्या सामन्यात स्टेडियमवर हजर असलेल्या मुंबई संघातील खेळाडूंच्या पत्नींनी आपल्या पतींची कामगिरी पाहून लक्षवेधी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आयपीएल 2021 मध्ये झालेल्या पाचव्या सामन्यात नीता अंबानीच्या मुंबई संघाने अभिनेता शाहरूख खानच्या कोलकाता संघाला 10 धावांनी पराभूत केले. या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक ही रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहला आणि कृणाल पंड्यची पत्नी पंखुडी शर्माला आपल्या फोनमध्ये सामन्याचे काही क्षण दाखवत असल्याचे दिसून आले.

सामना पाहण्याकरीता आलेल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या पत्नींनी आपल्या पतींची कामगिरी पाहून दिलेली प्रतिक्रिया कॅमेरामनने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.

https://twitter.com/ImRitika45/status/1382038447993495552

तसेच आयपीएलमध्ये जवळजवळ 7 वर्षानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा गोलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. परंतु पहिला चेंडू टाकण्याआधीच त्याचा पाय मुरगळल्याने तो जमिनीवर बसून वेदनांनी तडफडू लागला. रोहितला झालेली वेदना पाहून स्टेडियममध्ये हजर असलेली त्याची पत्नी रितिका सजदेही अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.

रोहित शर्मा खाली बसला, त्यावेळी टीव्ही कॅमेर्‍याचे लक्ष रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिच्याकडे होते, यात ती बरीच अस्वस्थ दिसली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

https://twitter.com/lodulalit001/status/1382018447106736128?s=20

या सामन्यात हार्दिक आणि त्याच्या संघाचे समर्थन करण्यासाठी आलेल्या नताशाने चष्मा, गुलाबी रंगाचा ऑफशोल्डर टॉप आणि जीन्स परिधान केली होती. परंतु तिचा पती या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. 17 चेंडूत 15 धावा करून तो प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरला.

तसेच हार्दिक पंड्याची वहिनी आणि कृणाल पंड्याची पत्नी पंखुडी शर्मा निळ्या रंगाचा डेनिम ड्रेस आणि मोकळे सोडलेल्या केसांमध्ये सुंदर दिसत होती. या सामन्यात कृणालची चांगली कामगिरी झाली, त्याने 4 षटकांत 13 धावा देऊन एक गडी बाद केला. परंतु फलंदाजीमध्ये तोही 15 धावा करून बाद झाला.

Photo Courtesy: Instagram/@natasastankovic
Photo Courtesy: Instagram/@pankhuriisharma
Photo Courtesy: Instagram/@pankhuriisharma

हा झालेला विजय मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएल मोसमातील पहिला विजय असल्याने त्यांच्या संघातील खेळाडू आणि त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यांवर स्पष्टपणे आनंद दिसत होता. नताशा आणि पंखुडी यांनी आपल्या पतींचे सामन्यातील फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरीवर ठेवले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

सनरायझर्स हैदाराबादविरुद्ध देवदत्त पड्डीकल खेळणार का नाही? प्रशिक्षक माईक हेसनने दिले उत्तर

धक्कादायक! माजी कर्णधार हिथ स्ट्रिकवर आयसीसीने घातली तब्बल ८ वर्षांची बंदी, लावण्यात आले ‘हे’ ५ आरोप

पड्डीकलचे पुनरागमन तर विलियम्सनची अनुपस्थिती, ‘अशी’ असेल RCB आणि SRH ची प्लेइंग इलेव्हन?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---