शुक्रवारी (24 मार्च) महिला प्रीमियर लीग 2023 चा एलिमिनेटर सामना पार पडला. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरिअर्स संघ या सामन्यात आमने सामने होते. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाशी बिडण्यासाठी मुंबई आणि यूपी संघ एलिमिनेटर सामना जिंकण्याच्या प्रयत्नात दिसले. दरम्यान, मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर, ज्या पद्धतीने बाद झाली, त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
मुंबई इंडियन्स महिला संघाने डब्लूपीएलच्या या पहिल्या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले आहे. हंगामातील पहिल्या 8 सामन्यांमध्ये मुंबईने 6 विजय मिळवले. सुरुवातीच्या सलग पाच सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. मुंबईच्या या यशामध्ये कर्णधार हसमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिचे योगदान मिहत्वाचे ठरले. पण या महत्वाच्या एलिमिनेटर सामन्यात हरमनप्रीत कौरने अवघ्या 14 धावा करून विकेट गमावली. इंग्लंडची दिग्गज गोलंदाज सोफी एक्लस्टन (Sophie Ecclestone) हिने हरमनप्रीतला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत त्रिफळाचीत केले.
हरमनप्रीत कौर हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा अनुभव आहे, पण शुक्रवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवर तिने अक्षरशः गुडघे टेकल्याचे दिसले. हरमनप्रीतच्या रूपात मुंबई इंडियन्सला तिसरा झटका बसला. मुंबईच्या डावातील 13व्या षटकात सोफी एक्लेस्टन गोलंदाजीला आली होती. तिने या षटकातील पाचवा चेंडू मधल्या स्टंप्सवर टाकला होता, जो हरमनप्रीतला खेळता आला नाही. हा चेंडू खेळण्यासाठी हरमनप्रीत हलकीशी बाहेर आली होती, पण चेंडू थेट स्टंप्समध्ये गेला आणि कर्णधाराला खेळपट्टी सोडावी लागली. संघाची धावसंख्या 104 असताना मुंबईने हरमनप्रीतच्या रूपात तिसरी विकेट गमावली. सोफीने या सामन्यात 4 षटकात 39 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. मुंबईसाठी नेट सायव्हर ब्रंड हिने 72 धावांची नाबाद आणि महत्वापूर्ण खेळी केली.
https://twitter.com/wplt20/status/1639282076573741059?s=20
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला. तर मुंबईने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये मुंबईने 4 बाद 182 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात यूपी वॉरिअर्सच्या सलामीवीर एलिसा हिली आणि श्वेता सेहरावत यांनी अनुक्रमे 11 आणि 1 धाव करून विकेट गमावली. यूपीची धावसंख्या 6 बाद 84 असताना मुंबईसाठी ईझी वाँग हिने 4 विकेट्स घेतल्या होत्या. यूपीच्या डावातील 13 व्या षटकात वाँगने विकेट्सची हॅट्रिक घेतली.
(Harmanpreet Kaur was clean bowled by Sophie Ecclestone)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Eliminator: नाणेफेक जिंकत यूपीचा गोलंदाजीचा निर्णय, मुंबई देणार फायनलसाठी झुंज
आयपीएल सुरू होण्याआधीच दिल्लीला जाणवली पंतची कमी! पाँटिंग मोठ्या निर्णयाच्या तयारीत