डाम्बुक (अरुणाचल प्रदेश),18 डिसेंबर : मानाभुम आॅफरोडर्स क्लब आॅफ अरुणाचल प्रदेशने जोरदार कामगिरी करत मंगळवारी जेके टायर आॅरेंज 4 बाय 4 फुरी किताब पटकाविला. पाच गुणांच्या आघाडीसह चौथ्या व शेवटच्या दिवशी प्रवेश करणाऱ्या या संघाने सध्याची चॅम्पियन
गेरारी आॅफ रोडर्सला पछाडले. एओसीए संघाने दिवसाच्या पहिल्या सत्रात विजय मिळवला आणि दुसऱ्या सत्रात चमक दाखवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
एमओसीए संघाचे नेतृत्व आदित्य मेई आणि उज्जल नामशुम यांच्याकडे होते.तर, संघाचे सहचालक चोव सुजीवन चोउटांग व चोव इंगींग हे होते. संघाला रिवर गटातील यशामुळे 100 गुणांची कमाई केली. मुख्य प्रतिस्पर्धी गेरारी आॅफरोडर्सने 90 गुणांसह तिसरे स्थान मिळवले.पण एक बंटिंग तोडल्यामुळे त्यांना 30 गुणांची पेनल्टी सहन करावी लागली.
गुरमीत सिंह (नेवीगेटर, गुरप्रताप संधु) व कबीर वाराइच (नेवीगेटर, युवराज सिंह) यांच्या चंदीगड संघाने चमकदार कामगिरी केली पण, संघाला त्यांची एक चूक चांगलीच महागात पडली. संघाने अंतिम फेरीत डाम्बुक रिवर स्टेज जिंकून 100 गुण मिळवले. पण, त्यांना किताब जिंकण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांना उपविजेतेपदाची ट्रॉफी व 1.5 लाख रुपयांवर समाधान मानावे लागले.विजेत्या संघास ट्रॉफी व 2.5 लाख रुपये मिळाले. दुसऱ्या उपविजेत्या बंगळुरू बीओडीए संघास एक लाख रुपये मिळाले.
एमओसीएचा आदित्य म्हणाला की, आम्ही आपल्या रणनीतीवर कायम होतो आणि पेनल्टी गुणांकडे दुर्लक्ष केले. आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी केली व आम्ही एकाच कुटुंबाशी संबंधित असल्याने आम्हाला सोपे गेले.चौघांमधील सर्वात मोठा असलेला चोव उज्जल म्हणाला की, फायनल पूर्वी आम्ही दबावाखाली होतो. जेव्हा आम्ही आघाडी घेतली तेव्हा आमचे जेतेपद निश्चित झाले होते.विजेत्या संघातील चारही भाऊ व्यवसायाने प्लांटर आहे.2012 मध्ये पहिल्यादा त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला व 2015 नंतर ते सातत्याने सहभागी होऊ लागले.आता हे सर्वजण रेन फॉरेस्ट चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहेत.
अंतिम निकाल :
1) एमओसीए (आदित्य मेई, चोव सुजीवन चोउटांग तसेच चोव उज्जल नामशुम व चोव मेन)
2) गेरारी आॅफ-रोडर्स (गुरमीत सिंह, गुरप्रताप संधु तसेच करीब वाराइच व युवराज सिंह तिवाना)
3) बीओडीए (मधुसूदन रेड्डी, ईआर रोहित व सिद्धार्थ संतोष , यानवेन जामियो)