लंडन। 2019 क्रिकेट विश्वचषकात रविवारी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना पार पडला.रोमहर्षक झालेल्या या सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांमुळे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले.
या विजयानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी त्यांनी शाम्पेनही उडवले. पण ज्यावेळी इंग्लंडने विश्वचषकाची ट्रॉफी हातात आल्यानंतर शाम्पेन उडवले त्यावेळी त्यांचे मोईन अली आणि आदील राशीद हे दोन खेळाडू अन्य संघातील खेळाडूंपासून दूर गेले. याचे फोटो आणि व्हि़डिओ सध्या सोशल माडियावर व्हायरल होत आहेत.
पण हे दोघे मुस्मीम धर्मात दारु वर्ज्य मानली जात असल्याने इंग्लंडचा संघ शाम्पेन उडवताना संघापासून दूर गेले होते. याआधी ज्यावेळीही संघ शाम्पेन उडवत सेलिब्रशन करतो त्यावेळी हे दोघे संघापासून दूर थांबतात.
यापूर्वीही अनेक मुस्लीम खेळाडूंनी दारुच्या ब्रँडचा लोगो जर्सीवर वापरण्यास नकार दिला आहे. यामध्ये हाशिम आमला, इम्रान ताहिर, ताब्राईज शम्सी, फवाद अहमद, राशीद खान अशा खेळाडूंची उदाहरणे आहेत.
अमलाने जर्सीवर कॅसल ब्रँडचा लोगो वापरण्यास नकार दिला होता. त्याने यासाठी दंडही भरला होता. तसेच शम्सीनेही आयपीएलमध्ये खेळताना किंगफिशरचा लोगो झाकला होता. त्याचबरोबर राशीद खानने बीगबॅश लीगमध्ये ऍडलेड स्ट्रायकरकडून खेळताना जर्सीवर संघाचे प्रायोजक वेस्ट एन्ड या ब्रँडचा लोगो वापरला नव्हता.
https://twitter.com/HaiderAkhtar1/status/1150482891434024960
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…आणि बेन स्टोक्सने मागितली केन विलियम्सनची माफी
–नोव्हाक जोकोविचने फेडररचा पराभव करत पाचव्यांदा मिळवले विम्बल्डनचे विजेतेपद
–संपूर्ण यादी: आत्तापर्यंत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हे खेळाडू ठरले सामनावीर