इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर चालू आहे. यात भारताच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून भारतीय संघाला एका मजबूत स्थितीत आणले. भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या. यात सर्वाधिक १२९ धावा केएल राहुलने केल्या. व त्यानंतर रोहित शर्माने ८३ धावा केल्या.
दरम्यान, इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने भारताविरुद्ध पहिल्या डावात गोलंदाजी करत एक विकेट घेतली. यासोबतच त्याने भारताविरुद्ध कसोटी सामन्यात एकूण ५० विकेट्स घेतल्या. यामुळे तो भारताविरुद्ध ५० विकेट घेणाऱ्या इंग्लंडच्या फिरकीपटू गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर येऊन पोहोचला. इंग्लंडच्या ग्रॅमी स्वान आणि मॉन्टी पानेसर सारख्या गोलंदाजांना देखील हा कारनामा करता आला नाही.
मोइन अली आधी हा कारनामा फिरकीपटू डेरेक अंडरवूडने केला होता. अंडरवूडने भारताविरुद्ध २० सामन्यात ६५ विकेट घेतले आहेत. ८४ धावा देऊन ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
मोईन अलीने भारताविरुद्ध १४ कसोटी सामन्यात एकूण ५० विकेट घेतले आहेत. यासोबत ५० विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अंडरवूड नंतर अली केवळ दुसराच फिरकीपटू गोलंदाज आहे. त्याचबरोबर त्याने दोन वेळा ५ विकेट्स घेतलेल्या आहेत. ६७ धावा देऊन ६ विकेट्स ही त्याची भारताविरुद्ध गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
आतापर्यंत इंग्लंडच्या एकूण ७ गोलंदाजांनी भारताविरुद्ध ५० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. ज्याने ३२ सामन्यांमध्ये १२७ विकेट घेतले आहेत. त्याने ५ वेळा डावात ५ विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. त्यानंतर ७१ विकेट्ससह स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ६२ विकेटसह डेरेक अंडरवूड तिसऱ्या स्थानी आहे. यानंतर रॉबर्ट विलीस (६२), इयान बोथम (५९) फ्रेडरिक ट्रुमन (५३) आणि आता मोइन अली (५०) यांचा क्रमांक लागतो.
महत्वाच्या बातम्या –
–“नीरज चोप्राचे पदक सर्व दक्षिण आशियाई लोकांचे आहे”, माजी श्रीलंकन गोलंदाजाचे भाष्य
–लॉर्ड्सवर शतक झळकवणाऱ्या केएल राहुलने एकेकाळी ‘या’ कारणामुळे स्वतःला १४ दिवस केले होते घरात बंद
–‘टेक ऑफ टू युएई’! मुंबई इंडियन्सचे खेळाडू अबुधाबीला रवाना, सीएसकेचा संघही दुबईत दाखल, पाहा व्हिडिओ