अंडर-19 आशिया कप 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जपानविरुद्धचा सामना 211 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने जपानला 340 धावांचे तगडे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात जपानचा संघ केवळ 128 धावाच करू शकला. भारतीय संघासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. या विजयासह भारताने स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे. यापूर्वी भारताला पाकिस्तानविरुद्ध 43 धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता.
भारतीय संघासाठी कर्णधार मोहम्मद अमानने अप्रतिम खेळी केली. त्याने क्रिझवर स्थिरावण्यास थोडा वेळ घेतला. त्यानंतर त्याने तुफानी खेळी खेळली. त्याच्यासमोर जपानचे गोलंदाज पूर्णपणे फेल ठरले. त्याने 118 चेंडूंत 122 धावांची शानदार खेळी केली, ज्यात सात चौकारांचा समावेश होता. त्याच्यामुळेच टीम इंडिया जपानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरली.
मोहम्मद अमान हा असा कर्णधार बनला आहे. ज्याने अंडर-19 आशिया कपमध्ये 122 धावा करून भारतासाठी सर्वात मोठी इनिंग खेळली आहे. त्याने उन्मुक्त चंदचा विक्रम मोडीत काढला आहे. उन्मुक्त चंदने 2012 च्या अंडर-19 आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 121 धावांची खेळी खेळली होती. आता अमन त्याच्याही पुढे गेला आहे. भारताकडून उन्मुक्तने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता त्याने अमेरिकेत खेळायला सुरुवात केली आहे. याशिवाय तो मेजर क्रिकेट लीग, बिग बॅश लीग आणि बांग्लादेश प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे.
जपानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद अमानशिवाय केपी कार्तिकेय आणि आयुष महात्रे यांनी दमदार खेळी केली. या दोन्ही खेळाडूंनी कर्णधाराला चांगली साथ देत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आयुषने डावाच्या सुरुवातीपासून दमदार फलंदाजी केली. पण तो वैयक्तिक 54 धावांवर तो बाद झाला. तर कार्तिकेयने 57 धावा केल्या. दुसरीकडे, आयपीएल मेगा लिलावात 1.10 कोटी रुपये मिळालेला वैभव सूर्यवंशी पुन्हा फ्लॉप ठरला. त्याला केवळ 23 धावा करता आल्या.
हेही वाचा-
सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी चॅम्पियन खेळाडू होणार नववधू, या दिवशी लग्न बंधनात अडकणार
IND vs JAP, U19 Asia Cup: टीम इंडियाचा शानदार विजय, जपानला लोळवले; कर्णधाराची शतकी खेळी!
IPL 2025; आगामी आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन खतरनाक?