पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि मोहम्मद आमिर यांनी वार्षिक करारात समावेश न केल्यामुळे एक मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गोलंदाजांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा व्हॉट्सऍप ग्रूप सोडला आहे. पीसीबीने हा ग्रूप फीटनेसशी निगडीत मेसेज पाठविण्यासाठी तयार केला होता. परंतु वार्षिक करारात समावेश न केल्यामुळे आमिर आणि हसनने नाराज होऊन हा ग्रूप सोडला आहे.
क्रिकेट पाकिस्तानच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही खेळाडूंच्या व्हॉट्सऍप ग्रूप (Left From PCB’s Whatsapp Group) सोडण्याचे खरं कारण समोर आलेले नाही. परंतु पीसीबीच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा कोणताही खेळाडूला वार्षिक करार मिळत नाही, तेव्हा तो स्वत:च ग्रूपमधून बाहेर पडतो. त्यामुळे आमिर आणि हसनचे व्हॉट्सऍपमधून बाहेर पडणे ही नवीन गोष्ट नाही.
आमिर आणि हसनला वार्षिक करारात स्थान न मिळण्याचे कारण-
खरंतर हसनच्या कमरेत दुखापत झाल्यामुळे मागील वर्षी त्याला अधिक सामने खेळता आले नाही. तसेच पुन्हा एकदा त्याच्या कमरेत दुखापत झाली, त्यामुळे पीसीबीने (PCB) त्याला वार्षिक करारातून (Central Contract) वगळले होते. असे म्हटले जात आहे की, पीसीबी हसनला उपचारासाठी ऑस्ट्रेलियामध्ये पाठवू शकते. परंतु कोरोना व्हायरसनंतर परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच हे शक्य होईल.
तसेच दुसरीकडे आमिरचा वार्षिक करारात समावेश न करण्यामागे राजनीति असल्याचे समजते. खरंतर आमिरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक, पीसीबीचे अधिकारी त्याच्यावर नाराज झाले होते.
वकार युनूसने (Waqar Younis) तर आमिरला गद्दारदेखील म्हटले होते. यानंतर जेव्हा वार्षिक कराराची घोषणा झाली, तेव्हा त्यामध्ये आमिरच्या नावाचा समावेश नव्हता. तरीही असे म्हटले जात आहे की, आमिरला इंग्लंड दौऱ्यासाठी (Tour of England) संघात स्थान मिळू शकते. असे सांगितले जात आहे की, जुलैमध्ये पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तसेच त्यासाठी २५ सदस्यांचा संघ निवडण्यात आला आहे. त्यात आमिरच्या नावाचा समावेश असू शकतो.
ट्रेंडिंग घडामोडी-
-४ महिन्यात २ विश्वचषकांचे आयोजन करु शकतो भारत देश
-हाॅस्पिटलमध्ये कोरोनाशी लढतोय फॅन, अचानक या खेळाडूने केला फोन
-कामगारांसाठी रस्त्यावर उतरला हा क्रिकेटर, भर उन्हात वाटतोय अन्न