---Advertisement---

पाकिस्तानचा ग्लेन मॅकग्रा असं त्याला म्हटलं जायचं; परंतु चुका एवढ्या महागात पडतील, असा विचार त्यानेही केला नसेल

---Advertisement---

२०१० स्पॉट फिक्सिंग प्रकरण, हे १९९९ नंतरच्या मॅचफिक्सिंग प्रकरणानंतर समोर आलेले क्रिकेटमधील सर्वात मोठे कांड होते. इंग्लंड व पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेत या प्रकरणाचे बिंग फुटले आणि संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ माजली. या प्रकरणात तीन खेळाडूंची ची नावे प्रामुख्याने समोर आली. कर्णधार सलमान बट सोबत दोन युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद अमीर.

न्यायालयीन प्रक्रियेनंतर निलंबन आणि बंदीच्या शिक्षा दिल्या गेल्या. बटने त्याची कारकीर्द तोपर्यंत बनविली होती. तर, शिक्षा पूर्ण झाल्यावर मोहम्मद आमीर पुन्हा पाकिस्तानसाठी खेळला. मात्र, या स्पॉट फिक्सिंगच्या भूताने मोहम्मद आसिफची क्रिकेट कारकीर्द कायमची संपवली.

पाकिस्तानमधील पंजाब भागातील एका सधन कुटुंबात आसिफचा जन्म झाला. शरीराने धडधाकट व ६ फूट ४ इंचाची उंची लाभलेला आसिफ, शालेय स्तरापासूनच वेगवान गोलंदाजी करत होता. शालेय स्तरावर चांगली कामगिरी करत असताना पाकिस्तानमधील प्रमुख स्पर्धा असलेल्या कायदे आजम या स्पर्धेसाठी तो नॅशनल बँक संघात निवडला गेला.

वाचा- धीरज जाधव- गुणवत्ता असून देशासाठी खेळू न शकलेला महाराष्ट्राचा महारथी

तीन वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने धुमाकूळ घातला. आपल्या वेगवान व धडकी भरवणाऱ्या गोलंदाजीने फलंदाजांना नाकीनऊ आणले. वसीम अक्रम, वकार युनिस व शोएब अखतरनंतर पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजी धुरा सांभाळणारा गोलंदाज म्हणून त्याची ख्याती तयार झाली.

२००५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले. मात्र तेथे तो अपयशी ठरला आणि संघातील जागा गमावून बसला. २००६ मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला असता, कराची कसोटीत त्याने द्रविड, लक्ष्मण, सेहवाग व युवराज यांना बाद केले. लक्ष्मण व युवराज यांना तर त्याने चांगलेच जखडून ठेवले. त्याच मालिकेत विनाकारण अपील केल्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला होता.

वाचा- युवराजपेक्षा सरस असलेला महाराष्ट्राचा अभिजीत काळे भारतासाठी खेळला फक्त एक सामना 

दरम्यान, इंग्लिश काउंटी क्लब लिस्टरने २००५ साली त्याच्या सोबत करार केला. आसिफने देखील लिस्टर संघाला निराश न करता ७ सामन्यात २५ बळी मिळवले. इंग्लंड दौऱ्यावर गेला असता तेथे खेळलेल्या एकमेव कसोटीत त्याने सहा गडी बाद केले.

टी२० क्रिकेटमधील पहिले निर्धाव षटक टाकण्याचा मान आसिफकडे जातो. त्याने ही कामगिरी इंग्लंड विरुद्ध केली होती. इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन मजेत म्हणलेला,

“आसिफवर बंदी आली हे एका अर्थाने चांगले झाले. मला यापुढे त्याची गोलंदाजी खेळावी लागणार नाही. मी खेळलेल्या सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी तो एक होता.”

वाचा- झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली

आसिफने पीटरसनला तीन वेळा पहिल्या चेंडूवर बाद केले होते. २००६ मध्ये अवघ्या ९ कसोटी खेळून तो अव्वल दहा गोलंदाजांमध्ये सामील झाला होता.

सरफराज नवाज, इंजमाम उल हक, इम्रान खान, बॉब वूल्मर यांसारख्या माजी खेळाडूंनी आसिफचे कौतुक केले होते. या सर्वांचे म्हणणे होते की,

“आसिफ पाकिस्तानचा सर्वात दिग्गज गोलंदाज होऊ शकतो. जी कामगिरी शॉन पोलॉक व ग्लेन मॅकग्रा आपापल्या संघांसाठी करतात, तशीच क्षमता आसिफकडे आहे. ”

२००७ च्या टी२० विश्वचषकाआधी, वरिष्ठ खेळाडू शोएब अख्तर व आसिफ यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये भांडणे झाली. अख्तरने त्याच्या मांडीवर बॅटने प्रहार केला होता. दोघांनाही त्यावेळी संघातून बाहेर करण्यात आले. चौकशीअंती, अख्तरची चूक असल्याने आसिफला विश्वचषकाच्या संघात सामील करून घेतले गेले. त्याचा विश्वचषक म्हणावा तितका चांगला गेला नाही.

पुढे, आयपीएलच्या पहिल्या मोसमासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने ६५०,००० अमेरिकन डॉलरची घसघशीत बोली लावून आसिफला आपल्या संघात समाविष्ट केले. त्यावर्षी, आसिफने आठ सामने खेळत आठ बळी घेतले. याच वेळी तो उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्याने त्याच्यावर बंदी घातली गेली. या आधी २००६ मध्ये सुद्धा तो उत्तेजक सेवन प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.

जुलै २०१० मध्ये पाकिस्तानच्या इंग्लंड दौर्‍यादरम्यान मोहम्मद असिफने मालिकेतील पहिल्या सामन्यात, आपला २० वा सामना खेळत असताना ऍलिस्टर कुकला बाद करत शंभरावा कसोटी बळी मिळवला.

याच मालिकेच्या अखेरच्या कसोटीनंतर आसिफ, आमिर आणि सलमान बट यांच्यावर स्पॉटफिक्सिंगचे आरोप लावण्यात आले. स्कॉटलॅन्ड यार्ड पोलीस यांनी याची चौकशी केली आणि चौकशीअंती तिन्ही खेळाडू दोषी आढळले.

सलमान बटवर १० वर्षाची, मोहम्मद आमीरवर ५ वर्षाची, तर आसिफवर ७ वर्षांची बंदी घातली गेली.
स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात गुंतण्यावेळी असिफ जागतिक कसोटी क्रमवारीत क्रमांक २ चा गोलंदाज होता.

पुढे, सलमान बटची शिक्षा पाच वर्षांनी कमी केली गेली, २०१५ मध्ये सजेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानसाठी खेळला. मात्र आसिफला अजून दोन वर्ष वाट पहावी लागली. २०१७ मध्ये त्याच्यावरील निलंबन मागे घेण्यात आले. वयाची पस्तिशी पार केल्यामुळे राष्ट्रीय संघात पुनरागमन करणे शक्य नव्हते.

अवघ्या २३ कसोटीत १०६ व ३८ वनडे सामन्यात ४८ बळी त्याची गुणवत्ता सिद्ध करतात. आसिफ निलंबनानंतर पाकिस्तानच्या घरेलू क्रिकेटमध्ये सियालकोट व ऊर्जा विभागासाठी कायदे आझम चषक खेळला. सध्या तो पाणी व ऊर्जा विभाग या संघाचा कर्णधार आहे. लालसेपोटी एका उभरत्या कारकिर्दीची अखेर आसिफने स्वतःहून करून घेतली.

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज

आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!

आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल फ्रंचायझी आहेत स्पॉन्सर्सच्या शोधात, तब्बल ९५% इन्वेंट्रीची केलीय विक्री

मार्चनंतर पहिल्यांदाच चाहत्यांना मिळाली स्टेडिअममध्ये एंट्री; तब्बल १००० चाहत्यांच्या उपस्थिती पार पडला सामना

बांगलादेशच्या या युवा गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---