fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

तुम्ही दोघे आता सन्मानाने निवृत्त व्हा नाहीतर…

पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांनी पाकिस्तानचे अनुभवी खेळाडू मोहम्मद हफीज आणि शोएब मलिक यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. 38 वर्षीय मलिक 1999 पासून तर 39 वर्षीय हफीज 2003 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.

रमीज राजा म्हणाले, ‘या दोन क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्मानाने निवृत्त व्हायला हवे.’ व्हिडिओ काँन्फरन्सद्वारे मीडियाशी बोलताना ते म्हणाले की कोणत्याही खेळाडूबद्दल वैयक्तिक मत मांडण्याचे ते टाळतात.

ते म्हणाले, ‘मी माझ्या कामानिमित्त दोन्ही क्रिकेटपटूंना भेटत असतो, त्यामुळे मी कोणतेही वैयक्तिक मत मांडण्याचे टाळतो. यात काही शंकाच नाही की त्यांनी इतकीवर्षे पाकिस्तान क्रिकेटची सेवा केली आहे. पण आता मला वाटते की निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे.’

त्याचबरोबर राजा म्हणाले त्यांना पाकिस्तान क्रिकेटमध्ये कोणतेही पद मिळवण्याची लालसा नसल्याने ते कोणत्या गोष्टीवर स्पष्ट मत मांडू शकतात. तसेच राजा म्हणाले, ‘हफीज आणि मलिकने जर आत्ता निवृत्ती घेतली तर पाकिस्तान क्रिकेटला फायदाच होईल. आपल्याकडे खेळाडूंची चांगली फळी आहे आणि आपल्याला पुढे जायला हवे.’

हफीजने याआधीच सांगितले आहे की यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकानंतर तो निवृत्ती घेईल. तसेच मलिकने मागीलवर्षी वनडे विश्वचषकानंतर वनडेतून निवृत्ती घेतली आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

३ फलंदाज जे घेऊ शकतात विराटची आयसीसी वनडेत क्रमावारीतील अव्वल जागा

क्रिकेटरचं झालं अवघड, आधी घरची काम करं; मगचं वापर सोशल मिडीया

अखेर १५ वर्षांनी नेहराने मागितली धोनीची माफी

You might also like