fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेटरचं झालं अवघड, आधी घरची काम करं; मगचं वापर सोशल मिडीया

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व कामकाज ठप्प पडले आहे. अशात प्रत्येकजण आपापल्या घरी वेळ घालवत आहेत. यात क्रिकेटपटूंचादेखील समावेश आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटू वेळ घालवण्यासाठी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.

यात आता पाकिस्तानी क्रिकेटपटूही इंस्टाग्रामवर लाईव्ह येत आहेत. याविषयीची माहिती पाकिस्तानचे अष्टपैलू क्रिकेटपटू शादाब खान (Shadab Khan) यांनी ट्विट करत दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, “मी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीसोबत इंस्टाग्रामवर लाइव्ह येणार आहे. यासाठी अलीने त्याच्या पत्नीची परवानगीही घेतली आहे.”

शादाबचे हे बोलणे ऐकूण इतर क्रिकेटपटूंनी अलीची खूप मजा घेतली.

शादाबने त्याचा संघसहकारी फलंदाज फखर जमानलाही (Fakhar Jaman) सांगितले की, तूही तुझ्या पत्नीची परवानगी घेऊन ये.

यावर आमिर शादाबची मजा घेत त्याला म्हणाला की, तु आता सगळ्यांना असे म्हणत आहेस, पण लवकरच तुझीही वेळ येईल.

यावर प्रत्युत्तर देत शादाब म्हणाला की, मी आताच हार मानली आहे.

पुढे आमिर म्हणाला की, मला शादाबची चिंता वाटत आहे. यावर शादाबने त्याची मजा घेत म्हटले, मी आतापासूनच तुझ्याप्रमाणे घरचे काम शिकत आहे. यानंतर तरी तुला परवानगी मिळेल. पण एवढे करूनही जर तुला परवानगी नाही मिळाली तर सोशल मीडियावरती तसंही काय ठेवलं आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-अखेर १५ वर्षांनी नेहराने मागितली धोनीची माफी

-कोरोनामुळे क्रिकेट सोडून चहल आजमावतोय या खेळात नशीब

-दररोज पब्जी खेळणारे ५ भारतीय क्रिकेटर

You might also like