fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

दररोज पब्जी खेळणारे ५ भारतीय क्रिकेटर

भारतीय क्रिकेटपटू अनेकदा मालिकांदरम्यान वेळ मिळेल तेव्हा काहीतरी उपक्रम करताना दिसतात. काहीजण एकत्र फिरायला जातात, काहीजण काही गेम्स खेळताना दिसतात. आजकाल भारताचे काही खेळाडू पबजी हा मोबाइल मल्टीप्लेअर ऑनलाइन गेम खेळतानाही दिसू लागले आहेत. अशा जवळजवळ दररोज पबजी गेम खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंचा घेतलेला हा आढावा –

सर्वाधिक पबजी खेळणारे भारतीय क्रिकेटपटू – 

एमएस धोनी –

कॅप्टनकूल एमएस धोनी सर्वात आधी पबजी गेम डाऊनलोड करणाऱ्या भारतीय खेळाडूंमधील आहे. आयपीएलच्या एका मोसमादरम्यान केदार जाधवने त्याची या गेमशी ओळख करुन दिली. धोनी हा गेम लवकर शिकला तसेच त्याला हा गेम चांगल्याप्रकारे खेळताही येतो.

भारतीय संघाच्या जवळ असणाऱ्या एका सुत्राने स्पोर्ट्सकिडाला माहिती दिली की धोनीला गेम खेळताना प्रतिस्पर्ध्यांची शिकार करायला आवडते. धोनीने २०१८ दरम्यान ही गेम खेळायला सुरुवात केली. त्यावेळी केदार, युजवेंद्र चहल, शिखर धवन हेे पबजी गेम नियमित खेळत होते. त्याने ही गेम लवकर शिकली आणि तो शक्यतो जेवणानंतर किंवा प्रवास करताना गेम खेळतो. पण तो अन्य खेळाडूंप्रमाणे नियमितपणे हा गेम खेळत नाही.

केदार जाधव –

२०१८ च्या सुरुवातील भारतीय क्रिकेट संघात पबजी गेमची ओळख करुन दिली ती केदार जाधवने. केदार नियमितपणे पबजी गेम खेळतो. त्याच्यामुळे भारतीय संघातील अनेक खेळाडूंना या गेमचे वेड लागले आहे.

केदार जेव्हाही त्याला रिकामा वेळ मिळतो तेव्हा पबजी गेम खेळत असतो. तो आयपीएलदरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघातील संघसहकाऱ्यांबरोबरही गेम खेळत असतो. केदार जाधवला गेम खेळण्याच्या असलेल्या अनुभवामुळे तो अनेकदा अन्य खेळाडूंना याबद्दल सल्लेही देत असतो.

युजवेंद्र चहल – 

केदार जाधवनंतर भारतीय संघात सर्वाधिक पबजी खेळणाऱ्यांमध्ये फिरकीपटू युजवेंद्र चहल आहे. त्यानेही २०१८च्या सुरुवातीलाच ही गेम खेळण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी त्याचा भारतीय संघातील अन्य खेळाडूंबरोबर विमानतळावर पबजी खेळतानाचा फोटोही व्हायरल झाला होता.

बऱ्याचदा जेव्हा केदार आणि चहल एकत्र संघात असतात तेव्हा पबजी खेळत असतात. ते कधीकधी तर रात्रीही ही गेम खेळतात. तसेच वेळ मिळेल तेव्हा हॉटेल लॉबीमध्ये बसूनही गेम खेळतात.

मोहम्मद शमी – 

भारतीय संघातील पबजी खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये शमीची एन्ट्री थोडी उशीरा झाली. पण असे असले तरी तो त्याआधी अनेकदा त्याच्या भावांबरोबर हा गेम खेळला होता. पण केदारच्याच पुढाकाराने शमीने भारतीय संघातील खेळाडूंबरोबरही पबजी खेळायला सुरुवात केली.

त्याने सुरुवातीला संघातील खेळाडूंना सांगितले नव्हते की त्याने त्याच्या भावाबरोबर गेम खेळली आहे. पण नंतर सर्वांना कळाले. आता तोपण संघातील नियमित पबजी खेळणाऱ्या खेळाडूंमधील एक आहे.

शिखर धवन – 

सलामीवीर फलंदाज शिखरनेही भारतीय संघातील पबजी खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये उशीरा एन्ट्री केली. तसेच त्याने देखील त्याच्या पत्नीबरोबर त्याआधी ही गेम अनेकदा खेळली आहे. सध्या तोही नियमित पबजी गेम भारतीय क्रिकेटपटूंबरोबर खेळत असतो.

ट्रेंडिंग घडामोडी – 

कोहलीची टीम इंडियात निवड करणाऱ्या खऱ्या रनमशीनचा आज आहे बड्डे

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, जुना खजाना पेटऱ्यातून येणार बाहेर

टीम इंडिया करतेय पाकिस्तानचं करोडोंच नुकसान, कारणही आहे तसंच

You might also like