fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, जुना खजाना पेटऱ्यातून येणार बाहेर

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक क्रीडा स्पर्धांवरही परिणाम झाला आहे. त्याचमुळे सध्या स्टार स्पोर्ट्सकडे लाईव्ह दाखवण्यासाठी कोणत्याही स्पर्धा नाही. त्यामुळे स्टार स्पोर्ट्सने बीसीसीआयला काही जून्या संग्रहातील सामने दाखवण्याची परवानगी मागितली आहे.

बीसीसीआय संग्रहातील सामन्यांची परवानगी देताना मोठी रक्कम घेते. बीसीसीआयचा हा ठेवा अतिशय महागडा समजला जातो. अगदी सचिन किंवा धोनीचे जे चित्रपट आले होते त्यांच्यासाठीही बीसीसीआयने फुटेज देताना पैसे घेतले होते. त्यामुळे स्टारस्पोर्ट्सचा हा प्रस्ताव पूर्ण होणे कठीण वाटत होते. परंतू टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय त्यांच्या संग्रहातील फुटेज देण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे स्टार आता भारताच्या काही ऐतिहासिक सामन्यांचे पुन:प्रसारण करु शकतात.

याबद्दल एका सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की ‘ही एक गोष्ट आहे जी बोर्डाच्या बाबतीत अगदी खास आहे. जेव्हा संग्रहित फुटेज शेअर करण्याचा विचार केला जातो तेव्हा ते बरेच डॉलर घेतात. ही खूप असामान्य परिस्थिती असल्याने स्टारने ही विनंती केलेली असावी. ते आता बीसीसीआयबरोबर ९ वर्षांपासून भागीदारीमध्ये आहेत. त्यामुळे बीसीसीआय कमीतकमी हे करु शकतात आणि बीसीसीआयने संग्रहीत फुटेज देण्याची तयारी दाखवली ही चांगली गोष्ट आहे.’

याबरोबरच कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल सुरु होण्यासाठी उशीर होऊ शकतो किंवा आयपीएल रद्द करावे लागू शकते, त्यामुळे बीसीसीआयने स्टार इंडियाला फोर्स मेजर कलमाबद्दल पत्रही लिहिले आहे. फोर्स मेजर कलम अंमलात तेव्हा येतो जेव्हा बाहेरील काही परिस्थितींमुळे एखाद्या पार्टिला कराराअंतर्गत असणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करता येत नाही.

सध्यातरी आयपीएलचा १३ वा मोसम १५ एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

टीम इंडिया करतेय पाकिस्तानचं करोडोंच नुकसान, कारणही आहे तसंच

रोहित शर्मावर टीका करणाऱ्यांना षटकार किंग युवीचा ‘करारा जवाब’

मुहूर्त हुकला! तब्बल ८ क्रिकेटपटूंची लग्न कोरोनामुळे ढकलली पुढे

You might also like