fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मुहूर्त हुकला! तब्बल ८ क्रिकेटपटूंची लग्न कोरोनामुळे ढकलली पुढे

कोरोना व्हायरसचे वाढते संकट पहाता भारताबरोबरच जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच जवळजवळ सर्वच क्रीडास्पर्धाही रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियातील जवळजवळ ८ खेळाडूंना कोरोना व्हायरसच्या संकटामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलावे लागले आहे.

क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पासह, जॅक्सन बर्ड, डॉर्सी शॉर्ट, मिशेल स्विप्सन, ऍलिस्टर मॅक्डरमॉट, अँड्र्यू टाय, जेस जोनासन आणि कॅटलीन फ्राईट यांना त्यांच्या लग्नाचा मुहुर्त पुढे ढकलावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटच्या व्यस्तवेळापत्रक आणि हवामानामुळे बऱ्याचदा क्रिकेटपटू एप्रिलमध्ये लग्न करतात. कारण या दरम्यान क्रिकेट मोसम संपलेला असतो.

त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटपटू लिझेल ली आणि तिची गर्लफ्रेंड तांजा क्रोनिए १० एप्रिलला लग्नबंधनात अडकणार होत्या. परंतू त्यांनाही सध्या त्यांचे लग्न स्थगित करावे लागले आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स देखील त्यांच्या लग्नाचा विचार पुढे ढकलू शकतात. मॅक्सवेलने नुकतेच काही दिवसांपूर्वी भारतीय वंशाच्या विनी रमणशी साखरपूडा केला आहे. तसेच मागील महिन्यातच कमिन्सनेही बेकी बोस्टन हिच्याशी साखरपूडा झाला असल्याची घोषणा केली होती.

ट्रेंडिंग घडामोडी – 

कारकिर्दीत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ भारतीय गोलंदाज, विराटही आहे यात सामील

जबरदस्त क्रिकेट खेळलेले व इंजिनीअरिंगच शिक्षण घेतलेले ११ क्रिकेटर्स

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

You might also like