fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

रोहित शर्मावर टीका करणाऱ्यांना षटकार किंग युवीचा ‘करारा जवाब’

भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या कामगिरीमुळे त्याच्यावर टीका केली जात होती. त्यामुळे आता टीकाकारांवर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग चांगलाच बरसला आहे.

युवराज (Yuvraj Singh) यावेळी म्हणाला की, कारकीर्दीतील सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये रोहितच्या फलंदाजीने त्याला पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज इंजमाम उल हकची (Inzamam Ul Haq) आठवण करून दिली होती.

रोहितने (Rohit Sharma) जून २००७मध्ये आयर्लंडविरुद्ध बेलफास्ट येथे वनडे पदार्पण केले होते. तसेच त्याने सप्टेंबर २००७मध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्ध डर्बन येथे टी२० पदार्पण केले होते. परंतु यावेळी रोहितला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती.

रोहितच्या सुरुवातीच्या कामगिरीबद्दल बोलताना युवराजने युट्युबवरील एका कार्यक्रमात सांगितले की, “मला असे वाटते की, रोहित जेव्हा भारतीय संघात आला होता, त्यावेळी तो आपल्याकडे शॉट खेळण्यासाठी खूप वेळ असल्याप्रमाणे फलंदाजी करत होता.”

युवराज पुढे म्हणाला की, “रोहितने त्यावेळी मला इंजमामची आठवण करून दिली होती. ज्यावेळी इंजमाम फलंदाजी करत होता तेव्हा त्याच्याकडे शॉट खेळण्यासाठी खूप वेळ असायचा.”

इंजमामने आपल्या कारकीर्दीत १२० कसोटी सामने, ३७८ वनडे सामने खेळले आहेत. त्याला दबावाच्या परिस्थितीत फलंदाजी करण्यासाठी ओळखले जाते. त्याने २००३-२००७ या कालावधीत पाकिस्तानचे नेतृत्व केले होते.

ट्रेंडिंग घडामोडी-

-कारकिर्दीत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ भारतीय गोलंदाज, विराटही आहे यात सामील

-जबरदस्त क्रिकेट खेळलेले व इंजिनीअरिंगच शिक्षण घेतलेले ११ क्रिकेटर्स

-वनडेत क्रिकेटमध्ये एका षटकात १७ चेंडू टाकणारा गोलंदाज

You might also like