fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टीम इंडिया करतेय पाकिस्तानचं करोडोंच नुकसान, कारणही आहे तसंच

पाकिस्तानबरोबरील द्विपक्षीय मालिका भारताने मागील काही वर्षात खेळलेल्या नाही. हे दोन संघ मागील ५-६ वर्षांपासून केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच आमने-सामने आले आहेत. त्यामुळे भारताबरोबर द्विपक्षीय मालिका होत नसल्याने मोठे नुकसान होत असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.

त्याचमुळे भरपाई म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने(पीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे(आयसीसी) मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्याच्या अधिकारांची मागणी केली आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासीम खानने म्हटले आहे की पाकिस्तान २०२३ मध्ये आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी तयार आहे.

खान म्हणाले, ‘मला वाटत नाही की पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणे मोठा मुद्दा राहिला आहे, कारण येथील सुरक्षा स्थिती सुधारली आहे.’

‘पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन करण्याबरोबरच श्रीलंका आणि बांगलादेश संघाबरोबरील कसोटी मालिकांचेही आयोजन येथे करण्यात आले आहे. आम्ही अनेक छोट्या स्पर्धांचे आणि मालिकांचे आयोजन केले आहे. त्यावरुन लक्षात येते की आम्ही आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यास सक्षम आहोत.’

याबरोबरच खान म्हणाले, पाकिस्तानला आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांचे यजमानपद यासाठीही मिळाली पाहिजे की भारत बऱ्याच काळापासून पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय मालिका खेळण्यास तयार नाही. यामुळे पाकिस्तानला बरेच अर्थिक नुकसान झाले आहे. निकटच्या भविष्यातही भारत-पाकिस्तान मालिकांचे संभावना कमी आहे.

तसेच खान म्हणाले, ते आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिराऱ्यांबरोबर टी२० विश्वचषक, आशिया चषक आणि टेस्ट चॅम्पियनशिप याबद्दल व्हिडिओ काॅन्फर्न्सद्वाे चर्चा करतील.

ट्रेंडिंग घडामोडी – 

रोहित शर्मावर टीका करणाऱ्यांना षटकार किंग युवीचा ‘करारा जवाब’

मुहूर्त हुकला! तब्बल ८ क्रिकेटपटूंची लग्न कोरोनामुळे ढकलली पुढे

कारकिर्दीत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ भारतीय गोलंदाज, विराटही आहे यात सामील

You might also like