fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कोहलीची टीम इंडियात निवड करणाऱ्या खऱ्या रनमशीनचा आज आहे बड्डे

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ साली राजापूर येथे झाला होता. त्यांनी जानेवारी १९७६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांना कर्नल या नावानेही ओळखले जाते.

वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी भारतीय संघाकडून ११६ कसोटी सामने आणि १२९ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्यांनी कसोटीत ४२.१३ च्या सरासरीने ६८६८ धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी वनडेत ३४.७३ च्या सरासरीने ३५०८ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतक आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे.

वेंगसरकरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकीर्दीतील ५ महत्त्वाच्या घडामोडींचा घेतलेला हा आढावा.

-दिलीप वेंगसरकरांनी लॉर्ड्सच्या मैदानावर चमकदार कामगिरी केली होती. कारण इंग्लंडच्या या लॉर्ड्स मैदानावर जिथे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकही शतक केले नाही, तिथे वेंगसरकर यांनी एक नव्हे तर तब्बल ३ शतके ठोकली होती. हे तिन्ही शतके त्यांनी इंग्लंडविरुद्धच केली आहेत.

-त्यांनी लॉर्ड्स येथे १९७९ मध्ये पहिले शतक, १९८२मध्ये दुसरे तर १९८६मध्ये तिसरे शतक झळकावले होते. विशेष म्हणजे लॉर्ड्सच्या मैदानावर खेळण्यात आलेल्या पहिल्या डावात एकही धाव न करताच बाद झाले होते.

वेंगसरकर हे लॉर्ड्स येथे ३ शतक झळकावणारे पहिलेच परदेशी खेळाडू होते. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) यांनीही लॉर्ड्समध्ये तीन शतके केली नाहीत.

-वेंगसरकरांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण १७ शतके झळकावली आहेत. परंतु त्यांच्या केवळ ४ शतकांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. हे चारही शतके त्यांनी १९८६-८७ दरम्यान केली होती.

-वेंगसरकरांनी १९८३ च्या विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर १९८७ साली झालेल्या विश्वचषकानंतर त्यांनी कपिल देवच्या (Kapil Dev) जागी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. कर्णधार म्हणून त्यांनी आपल्या पहिल्याच मालिकेत २ शतके ठोकली होती.

त्यानंतर १९८९मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारताचा पराभव झाला होता. यानंतर वेंगसरकर यांना कर्णधारपदावरून काढण्यात आले होते.

-वेस्ट इंडीजविरुद्ध चांगल्या चांगल्या फलंदाजांना जे जमले नाही ते वेंगसरकर यांनी करून दाखवले. त्यांनी विंडीजविरुद्ध ६ शतके ठोकली होती. वेंगसरकर यांनी मॅल्कम मार्शल, मायकल होल्डिंग आणि अँडी रॉबर्ट्स यांसारख्या खेळाडूंचा सामना केला आणि अधिक धावा केल्या.

-वेंगसरकरांनी भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीची भारतीय संघात निवड केली होती. २००६ साली त्यांनी मुख्य निवडकर्ताचे पद भूषविले होते. तसेच भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वात २००८मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता.

त्यावेळी वेंगसरकर यांनी विराटला २००८मध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याबद्दल सांगताना वेंगसरकर यांनी खुलासा केला की, एमएस धोनी (MS Dhoni) आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirtsen) हे विराटला संघात घेण्याच्या बाजूने नव्हते.

त्यांना आपल्या जुन्या संघाबरोबरच श्रीलंका दौऱ्यावर जायचे होते. परंतु वेंगसरकर यांनी विराटची कामगिरी पाहून अखेर त्याला भारतीय संघात घेतले.

सध्या विराटला जागतिक दर्जाच्या फलंदाजांमध्ये गणले जाचे. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके झळकावली आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, जुना खजाना पेटऱ्यातून येणार बाहेर

-टीम इंडिया करतेय पाकिस्तानचं करोडोंच नुकसान, कारणही आहे तसंच

-मुहूर्त हुकला! तब्बल ८ क्रिकेटपटूंची लग्न कोरोनामुळे ढकलली पुढे

You might also like