fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

३ फलंदाज जे घेऊ शकतात विराटची आयसीसी वनडेत क्रमावारीतील अव्वल जागा

सध्या कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात हाहाकार माजवत आहे. या व्हायरसमुळे सर्व क्रीडा क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असले तरीही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. मात्र मागील काही दिवसांपासून विराटचा फॉर्म फार काही चांगला नसल्यामुळे त्याच्या गुणांमध्ये घसरण झाली आहे.

चांगली फलंदाजी आणि आकडेवारीमुळे क्रमवारीत बदल होत असतात. याबरोबरच असे अनेक फलंदाज आहेत, जे वनडे क्रिकेटमध्ये यावेळी शानदार प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे हा विराटसाठी चिंतेचा प्रश्न ठरत आहे.

विराटसाठी न्यूझीलंड दौरा खास ठरला नाही. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देशांतर्गत मालिकेत त्याच्याकडून अपेक्षा केल्या जात होत्या परंतु हा दौरा रद्द करण्यात आला होता.

जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज आहेत, जे वनडे क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर चांगली खेळी करून ते वनडे क्रमवारीत विराटचे स्थान घेऊ शकतात. अशा खेळाडूंचा घेतलेला आढावा.

आयसीसी वनडे क्रमवारीत हे ३ खेळाडू विराटची जागा घेऊ शकतात-

३. रॉस टेलर-

न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज रॉस टेलरने (Ross Taylor) भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. टेलर या वनडे क्रमवारीमध्ये चौथ्या क्रमांकावर ८२८ गुणांसह विराजमान आहे. विराट या यादीत ८६९ गुण आहेत. त्यामुळे असे म्हटले जाऊ शकते की, टेलर विराटची जागा घेऊ शकतो.

दोन मालिकेमध्ये जर टेलरने चांगली खेळी केली आणि विराटने खराब कामगिरी केली, तर क्रमवारीमध्ये बदल दिसू शकतो. त्यामुळे टेलरला विराटपुढील संकट मानले जात आहे.

२. बाबर आझम-

पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम (Babar Azam) मागील काही वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहे. नुकत्याच झालेल्या वनडे व्यतिरिक्त टी२० मध्येही बाबरने चांगली कामगिरी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये सध्या पाकिस्तानचा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. वनडे क्रमवारीमध्ये तो ८२९ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

त्याची तुलना अनेक वेळा विराट कोहलीबरोबर (Virat Kohli) केली जाते. काही सामन्यांमध्ये जर त्याने आणखी चांगली कामगिरी केली तर तो विराटला सहजपणे मागे टाकू शकतो. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे.

१. रोहित शर्मा-

भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) आज सर्वजण ओळखतात. विराटला या वनडे क्रमवारीमध्ये (ODI Ranking) मागे टाकण्याच्या शर्यतीत रोहित सर्वात जवळ आहे. तसा तो फॉर्ममध्येही आहे. विशेष म्हणजे कोणत्याही मालिकेत तो किमान दोन डावांत तरी चांगली कामगिरी करतोच.

वनडे क्रिकेटमध्ये रोहितने ३ वेळा द्विशतक केले आहे. या वनडे क्रमवारीमध्ये तो ८५५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तसेच विराटपासून तो केवळ १४ गुणांनी मागे आहे. त्यामुळे अव्वल क्रमांक पटकाविण्यासाठी त्याच्याकडे सर्वप्रथम संधी (Opportunity) मिळेल. त्यासाठी त्याला आपला फॉर्म ठीक करावा लागेल.

ट्रेंडिंग घडामोडी-

-अखेर १५ वर्षांनी नेहराने मागितली धोनीची माफी

-कोरोनामुळे क्रिकेट सोडून चहल आजमावतोय या खेळात नशीब

You might also like