fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयसीसीच्या स्पर्धांत ५०पेक्षा जास्त सामन्यात नेतृत्त्व करणारे दोन कर्णधार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद क्रिकेटच्या अतिशय मोजक्या परंतु महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन करते. यात दर ४ वर्षांनी होणारा वनडे विश्वचषक, दर दोन वर्षांनी होणारा टी२० विश्वचषक व ४ वर्षांनी होणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी यांचा समावेश आहे.

या महत्त्वाच्या स्पर्धेत नेतृत्त्व करण्याची संधी मिळण्यासारखा सन्मान नाही. जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी या स्पर्धेत संघाचं नेतृत्त्व केलं आहे परंतु एमएस धोनी व रिकी पाॅटींग असे दोघेच आहेत ज्यांनी ५० पेक्षा अधिक सामन्यात संघाच या स्पर्धेत नेतृत्त्व केलं आहे. MS Dhoni-Ricky Ponting Only Captains to lead 50+ matches in ICC Tournaments.

२. रिकी पाॅटींग

रिकी पाॅटींगने आयसीसीच्या स्पर्धांत ५१ सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व केले आहे. यात त्याने वनडे विश्वचषकात २९ सामने, चॅम्पियन्स ट्राॅफीत १६ सामने तर टी२० विश्वचषकात ६ सामने त्याने हे नेतृत्त्व केले आहे.

१. एमएस धोनी

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयसीसीच्या सर्व ट्राॅफी जिंकणारा पहिला व एकमेव कर्णधार आहे. त्याने आयसीसीच्या स्पर्धांत ५८ सामन्यात भारताचे नेतृत्त्व केले आहे. यात त्याने वनडे विश्वचषकात १७सामने, चॅम्पियन्स ट्राॅफीत ८ सामने तर टी२० विश्वचषकात ३३ सामने त्याने हे नेतृत्त्व केले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-अखेर १५ वर्षांनी नेहराने मागितली धोनीची माफी

-कोरोनामुळे क्रिकेट सोडून चहल आजमावतोय या खेळात नशीब

You might also like