भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर भारतीय फलंदाजीबद्दल मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. परंतु फलंदाजीच खराब नव्हती, तर क्षेत्ररक्षण सुद्धा वाईट होते. जेव्हापासून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून 7 सामन्यात भारतीय संघाने जवळपास 20 झेल सोडले आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर माजी दिग्गज खेळाडू मोहमद कैफने निशाणा साधला आहे.
मोहम्मद कैफ भारतीय संघाच्या खेळाडूंवर निशाण साधत म्हणाला, भारतीय संघ गोलंदाजी आणि फलंदाजीच्या सरावाला जेवढे जास्त महत्त्व देते, त्यामानाने क्षेत्ररक्षणाच्या सरावाला महत्त्व देत नाही आणि या सरावाला मनावर घेत नाही. त्याचबरोबर भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात पाच झेल सोडले होते.
भारतीय संघ क्षेत्ररक्षणावर कष्ट घेत नाही
मोहमद कैफ ‘बॉक्सिंग डे’ कसोटीपूर्वी म्हणाला, भारतीय संघ मागील काही महिन्यांपासून सातत्याने खराब क्षेत्ररक्षण करत आहे. तो म्हणाला, “आपण काही उत्कृष्ट झेल बघितले आहेत. परंतु जर कोणी म्हणाले की, भारतीय क्षेत्ररक्षण सुधारत आहे, तर त्यावर मी प्रतिक्रिया देवू शकत नाही. कारण भारतीय संघाने मागील 5 ते 6 महिन्यात खराब क्षेत्ररक्षण केले आहे. त्यांना खूप जास्त सुधारणा करण्याची गरज आहे.”
“गचाळ क्षेत्ररक्षण हे कमी प्रमाणात सराव केल्याचा परिणाम आहे. माझे म्हणणे आहे की, प्लेईंग इलेव्हनमध्ये क्षेत्ररक्षणाच्या आधारावर निवड करायला पाहिजे. विराट कोहली सुद्धा झेल सोडत आहे. प्रत्येकजण झेल सोडत आहे. लॉकडाऊननंतर भारतीय क्षेत्ररक्षणाचा दर्जा ढासळला आहे. परंतु 3-4 महिन्यांनंतरही ऑस्ट्रेलियात झेल सुटत आहेत. जर तुम्ही मेहनत घेतली, तरच मैदानावर परिणाम दिसतील. मी बघितले आहे, खेळाडू क्षेत्ररक्षणावर कमी मेहनत करतात आणि फलंदाजी व गोलंदाजी यावर जास्त लक्ष देतात.”
मोहमद कैफचे म्हणणे आहे योग्य
मोहमद कैफचे म्हणणे पूर्णपणे योग्य आहे. ऍडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाने पाच झेल सोडले होते. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने 12 संधी गमावल्या आहेत. त्याचबरोबर वनडे मालिकेत 6 झेल सोडले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात 6 झेल सोडले होते. त्याचसोबत 2010 साली इंग्लंड दौर्यावर असताना 10 झेल सोडले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘केएल राहुलला संघाबाहेर पाहून दुःख होते’, भारताच्या माजी फलंदाजाची प्रतिक्रिया
‘त्या’ व्यक्तीमुळे मोहम्मद आमिरने घेतली निवृत्ती; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा मोठा खुलासा