नवी दिल्ली । भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये सामील असणारा भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने यो-यो टेस्टची तुलना आपल्या काळाशी केली आहे.
कैफ जवळपास ६ वर्षे भारतीय संघात खेळला होता. त्या दरम्यान तो आपल्या फलंदाजीबरोबरच आपल्या क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जात होता. तेव्हा कैफबद्दल असे म्हटले जात होते की, वनडे सामन्यात तो भारतासाठी ३५ ते ४० धावा आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या दमावर वाचवत होता.
कैफला यो-यो टेस्टबद्दल प्रश्न विचारला असता त्याने सांगितले की, त्याच्या दौऱ्यात केवळ २ किंवा ३ खेळाडूंनाच ही चाचणी पूर्ण करता आली असती.
कैफने हॅलो ऍपमार्फत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होता. त्यादरम्यान त्याला यो-यो टेस्टबद्दल प्रश्न विचारला की, जर त्याच्या काळात यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) असती तर, कोणते खेळाडूंना ती पूर्ण करता आली असती? यावर प्रत्युत्तर देत तो म्हणाला की, “जर आमच्या काळात ही चाचणी असती तर, मला वाटते की, लक्ष्मीपति बालाजी (Lakshmipathy Balaji) आणि मी ही चाचणी पूर्ण केली असती. याव्यतिरिक्त युवराज सिंगदेखील (Yuvraj Singh) ही चाचणी पूर्ण करू शकला असता. परंतु मला असे वाटते की, याव्यतिरिक्त आणखी कोणत्याही खेळाडूला ही चाचणी पूर्ण करता आली नसती.”
मार्च २०००मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणारा कैफ २००३च्या विश्वचषकातील महत्त्वाचा भाग होता. भारताला २००२मध्ये नेटवेस्ट मालिकेत विजय मिळवून देणाऱ्या कैफच्या काळात भारतीय संघाच्या खेळाडूंच्या फीटनेसवर आजप्रमाणे लक्ष दिले जात नव्हते. परंतु त्या काळातही कैफची फीटनेस उत्कृष्ट होती.
त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत भारताकडून एकून १३ कसोटी सामने आणि १२५ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ६२४ आणि वनडेत २७५३ धावा केल्या आहेत. यात एकूण ३ आंतरराष्ट्रीय शतकांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पाकिस्तानच्या ‘या’ कर्णधाराच्या आजोबांनी युपीतून लढवली होती ग्रामपंचायत निवडणूक
-… म्हणून रोहित आणि अजिंक्यला करता येत नाही क्रिकेटचा सराव
-ऑगस्टमध्ये ‘या’ संघाबरोबर टीम इंडिया खेळणार टी२० मालिका