लेजेंड्स क्रिकेट लीग २०२२ स्पर्धेला (Legends cricket premier league 2022) जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात इंडिया महाराजा आणि आशिया लायन्स (India maharajas vs Asia lions) हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात इंडिया महाराजा संघाने आशिया लायन्स संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यासह इंडिया महाराजा संघाने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला. या सामन्यात इंडिया महाराजा संघाकडून युसुफ पठाण आणि मोहम्मद कैफ यांनी तुफान फटकेबाजी केली. दरम्यान सामना झाल्यानंतर मोहम्मद कैफने ट्विट (Mohammad kaif tweet) करत आयपीएल फ्रँचायजींना ऑफर दिली आहे.
मोहम्मद कैफ (Mohammad kaif) आणि युसुफ पठाण (Yusuf Pathan) या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. हे दोन्ही खेळाडू जेव्हा फलंदाजी करण्यासाठी यायचे त्यावेळी गोलंदाजांना घाम फुटल्याशिवाय राहायचा नाही. तोच आक्रमक अंदाज आशिया लायन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील पाहायला मिळाला. या सामन्यात युसुफ पठाणने ४० चेंडूंमध्ये तुफानी ८० धावांची खेळी केली. तर मोहम्मद कैफने ३७ चेंडूंमध्ये ४२ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर इंडिया महाराजा संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते.
या विजयानंतर मोहम्मद कैफने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर युसुफ पठाणसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कॅप्शन देत त्याने फ्रँचायजिंना ऑफर दिली आहे. त्याने लिहिले की, “आयपीएल फ्रँचायजी आम्ही तयार आहोत.. लिलाव होण्यापूर्वी आम्हाला मेसेज करा. एकावर एक मोफत पर्याय उपलब्ध आहे.”
IPL teams we are ready. DM before auction. Ek pe ek free wala option bhi hai … 😊 @llct20 pic.twitter.com/FRyQdJCv9d
— Mohammad Kaif (@MohammadKaif) January 21, 2022
या ट्विटवर प्रतिसाद देत कोलकाता नाईट रायडर्स संघाने ‘भाई.. वाह..चा व्हिडिओ शेअर करत, लिहिले आहे की, ‘ऑफर तर चांगली आहे..’
👀 Offer toh zabardast hai! #IPLAuction pic.twitter.com/z3ujZBwrf3
— KolkataKnightRiders (@KKRiders) January 21, 2022
तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाने या ट्विटला प्रतिसाद देत लिहिले की, ‘प्रिय आयपीएल फ्रँचायजी , आम्ही आधीच आरटीएम कार्डचा वापरत आहोत.’
Dear fellow IPL teams, we're using the RTM card already 👋🏽
— Delhi Capitals (@DelhiCapitals) January 21, 2022
तसेच या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंडिया महाराजा संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आशिया लायन्स संघाने इंडिया महाराजा संघासमोर १७६ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंडिया महाराजा संघाने ५ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले होते. आशिया लायन्स संघाकडून उपुल थरांगाने ६६ धावांची खेळी केली. तर कामरान अकमलने २५ धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या :
टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक घोषित; भारत-पाकिस्तान सामना रंगणार ‘या’ दिवशी
“स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे…” बीबीएल पदार्पणानंतर उन्मुक्त झाला भावूक
हे नक्की पाहा: