---Advertisement---

मोहम्मद कैफ केएल राहुलबाबत म्हणाला, ‘लग्नाच्या पार्टीचीही ऑर्डर घेतो’; वाचा संपूर्ण प्रकरण

On: शनिवार, जानेवारी 1, 2022 6:37 PM
KL Rahul and Mohammad Kaif
---Advertisement---

भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याचे विविध स्तरातून कौतुकही होत आहे. अनेक माजी खेळाडूंनीही त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. तसेच माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने देखील केएल राहुलचे खूप कौतुक केले आहे. कैफने केएल राहुलसाठी केलेले ट्वीट सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्यूरियन कसोटीतील भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने केएल राहुलबद्दल एक मजेशीर ट्विट आपल्या अकाउंटवरून केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 113 धावांनी जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात केएल राहुलने शानदार फलंदाजी करत पहिल्या डावात 123 धावांच्या खेळीसह शानदार शतक झळकावले. राहुलला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

मोहम्मद कैफचे गतमीदार ट्वीट
मोहम्मद कैफने ट्वीटमध्ये लिहिले, ‘केएल राहुल मला राहुल द्रविडची आठवण करून देतो, एक खेळाडू म्हणून, नेहमी संघाला प्रथम स्थान देतो, सलामीवीर फलंदाज म्हणून खेळतो, यष्टिरक्षण करतो, खालच्या क्रमाने फलंदाजी करतो. संकटमोचक, भविष्यातील कर्णधार. लग्नाच्या पार्टीचीही ऑर्डर घेतो.’

मोहम्मद कैफने केएल राहुलवर जोरदार स्तुतीसुमने उधळली आहेत की, तो भारतीय संघासाठी कोणत्याही भूमिकेत योगदान देऊ शकतो. गंमत म्हणून त्यांनी शेवटी लिहिले आहे की, लग्नाची पार्टीचीही ऑर्डर घेतो. त्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही टीम इंडियामध्ये केएल राहुलकडून कोणतेही काम घेऊ शकता.

भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकला आहे. आता पुढील कसोटी सामना 3 जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे होणार आहेत.

पण, दुसऱ्या कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला एक मोठा धक्का पोहचला आहे की, क्विंटन डी कॉक याने पहिल्या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे फलंदाजीच्या बाजूंनी कमजोर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का आहे . भारत अजूनपर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेला नाही, त्यामुळे आता भारताला इतिहास घडवण्याची संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट-अनुष्काने टीम इंडियासह नववर्षाचे केले स्वागत, फोटो होतायेत व्हायरल

जो रूटवर माजी इंग्लिश कर्णधाराची खरमरीत टीका; म्हणाला…

१ जानेवारी ही तारीख क्रिकेटविश्वात फक्त मायकल बेवनच्या ‘त्या’ खेळीसाठी ओळखली जाते

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---