भारतीय संघाचा दिग्गज क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफने आपला संघसहकारी राहिलेल्या हेमंग बदानीची २००४ मधील एका चुकीसाठी माफी मागितली आहे. कैफने पाकिस्तानविरुद्ध २००४मध्ये खेळण्यात आलेल्या एका सामन्यातील एक लहान व्हिडिओ क्लिप आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. ती पोस्ट शेअर त्याने बदानीची माफी मागितली आहे.
कैफने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाची एक झलक पहायला मिळते. भारतीय संघ २००४ साली पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यादरम्यान कराची येथे खेळण्यात आलेला पहिला वनडे सामना वेगळ्याच वळणावर होता. पाकिस्तान संघासमोर भारतीय संघाने ३५० धावांचा भला मोठा डोंगर उभा केला होता. आणि त्या सामन्यात पाकिस्तान विजयापासून केवळ १० धावा दूर होता, तेव्हा कैफने झेल घेत सामना भारतीय संघाच्या बाजून वळवला होता.
हा व्हिडिओ पोस्ट करत कैफने (Mohammad Kaif) लिहिले, “तारुण्यातील निर्भीडपणा तूम्हाला अशक्य गोष्टींचाही पाठलाग करायला आणि त्या गोष्टी दोन्हीही हातांनी झेलायला लावतो. अरे माफ कर बदानी भाई.”
त्या सामन्यात पाकिस्तान संघाला ८ चेंडूत १० धावांची आवश्यकता होती. त्यावेळी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या (Zaheer Khan) चेंडूवर शोएब मलिकने लाँग ऑनच्या दिशेने लांब शॉट मारला. त्या ठिकाणी बदानी झेल झेलण्यासाठी योग्य जागेवर उभा होता. परंतु लाँग ऑफवर उभा असलेल्या कैफचे लक्ष बदानीकडे नव्हते. आणि तो चेंडूकडे ध्यान देत वेगाने धावत येत होता. कैफने चेंडूच्या जवळ पोहोचताच हवेत डाईव्ह मारली आणि चेंडू दोन्ही हातात सुरक्षितरीत्या झेलला.
Fearlessness of youth makes you chase the impossible and grab it with both hands. Oops sorry Badani bhai. pic.twitter.com/Yn3yxJ1JEK
— Mohammad Kaif (@MohammadKaif) July 25, 2020
यादरम्यान काही अंतराने बदानीचे (Hemang Badani) डोके कैफला धडकण्यापासून वाचले आणि त्याची टोपी कैफला धडकून खाली पडली. कैफ झेल झेलण्याच्या आनंदात वेगाने संघातील इतर खेळाडूंकडे आनंद साजरा करण्यासाठी पोहोचला. अशाप्रकारे भारतीय संघाने तो सामना ५ धावांनी आपल्या नावावर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-अखेर इंग्लंडला मिळाला नवा हिरो, आता तिन्ही फॉरमॅटमध्ये मिटली इंग्लंडची चिंता
-स्टीव्ह बकनरवर पठाण भडकला, बकनर तुम्ही चुका नाही केल्या तुम्ही तर…
-१४० किलो वजनाच्या वेस्टइंडीजच्या खेळाडूने पकडला अप्रतिम झेल, कॅप्टनही झाला अवाक्
ट्रेंडिंग लेख-
-निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू
-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
-अगदी सौरव तिवारीपासून ‘या’ ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी