---Advertisement---

केवळ ब्रेंडन मॅक्यूलमचे नाव असलेल्या ‘त्या’ विक्रमाच्या यादीत आता मोहम्मद रिजवाननेही मिळवले स्थान

On: शनिवार, फेब्रुवारी 13, 2021 12:57 AM
Mohammad-Rizwan
---Advertisement---

पाकिस्तान संघातील खेळाडूंची जरी आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत निवड झाली नसली. तरीसुद्धा ते आपल्या खेळातून दाखवून देत आहेत की, ते सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीत. आता परदेशी संघ देखील पाकिस्तानमध्ये येऊन मालिका खेळत आहेत. पाकिस्तानी खेळाडूसुद्धा आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने संघाला सामना जिंकवून देत आहेत. अशातच पाकिस्तान संघाच्या यष्टिरक्षक मोहम्मद रिजवानने नवीन कारनामा करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने दाखवून दिले आहे की येणाऱ्या काळात पाकिस्तान संघासाठी तो महत्वाची भूमिका बजावू शकतो.

गुरुवारी(११ जानेवारी) पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना पाकिस्तानने रिजवानच्या शतकी खेळीच्या जोरावर जिंकला. रिजवानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाकडून ६४ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह १०४ धावांची खेळी केली.

या खेळीसह तो क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक झळकावणारा जगभरातील दुसरा यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे. त्याने याआधी कसोटीत १ आणि वनडेमध्ये २ शतके केलेली आहेत.

याआधी असा कारनामा न्यूझीलंड संघाचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्यूलमने केला आहे. त्याने यष्टीरक्षक म्हणून खेळताना कसोटीत ५, वनडेत ३ आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १ शतक केले आहे.

पाकिस्तानने ३ धावांनी जिंकला सामना –

पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना रिजवानच्या शतकामुळे २० षटकात ६ बाद १६९ धावा केल्या. रिजवान व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला २५ धावांचा आकडाही पार करता आला नाही. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकात ६ बाद १६६ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना केवळ ३ धावांनी सामना गमवावा लागला. पाकिस्तानकडून हॅरिस रॉफ आणि उस्मान कादिरने प्रत्येकी २ विकेट्स तर फाहिम अश्रफने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल लिलावासाठी निवड न झालेला श्रीसंत झाला भावूक; शेअर केला ‘हा’ व्हिडिओ

छोटा पॅक बडा धमाका! बेस प्राईज २० लाख असलेल्या ‘या’ खेळाडूंवर आयपीएल लिलावात पडणार पैशांचा पाऊस

चाळीशी पार करून ‘पठ्ठ्या’ उतरलाय आयपीएलच्या लिलावात, एकेकाळी खेळला होता विराटसोबत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---