पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताविरुद्धचा आशिया चषकातील सुपर-4 चा सामना 5 विकेट्सने जिंकला. दुबईच्या दुबई क्रिकेट स्टेडियमवर झालेला हा सामना पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याने गाजवला. 30 वर्षीय रिझवानने जखमी झाल्यानंतरही या सामन्यात पाकिस्तानकडून एकाकी झुंज दिली. मात्र सामन्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे समजत आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे?, याबद्दल अजून कसलीही माहिती पुढे आलेली नाही. मात्र पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी (04 सप्टेंबर) आशिया चषकातील दुसरा सुपर-4 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. भारतीय संघाच्या डावादरम्यान 15 व्या षटकात डोक्यावरून जात असलेला एक चेंडू अडवण्याच्या नादात रिझवानला दुखापत झाली होती. रिझवानने जरा जास्त मेहनत घेत हवेत उंच उडी मारली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय दुखावला होता. यानंतर काही मिनिटांसाठी सामना थांबवण्यात आला होता आणि रिझवानवर उपचार केले होते.
@imVkohli leaving the ground after a small cramp and @iMRizwanPak staying in the field,suffering from immense pain,struggling with injury,still playing and winning the match for his country….now you know who the real KING is….this man is love 🫡🫡🖤🖤 pic.twitter.com/dwiRn27VPK
— jyesha nawaz (@JyeshaNawaz) September 5, 2022
उपचारानंतर काही वेळातच रिझवान उठून उभा राहिला आणि सामना पूर्ण केला. यष्टीरक्षणानंतर रिझवानने फलंदाजी करताना मॅच विनिंग खेळीही केली. भारताच्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रिझवानने 51 चेंडू खेळताना 71 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 2 षटकार आणि 6 चौकार मारले. त्याची ही खेळी संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली.
दुखापतीनंतरही क्रिकेटप्रती समर्पण दाखवलेल्या रिझवानला सामन्यानंतर एमआरआयसाठी दुबईतील रुग्णालयात नेण्यात आले आहे. आता पाकिस्तान संघाला त्याच्या दुखापतीच्या रिपोर्ट्सची प्रतिक्षा आहे. रिपोर्ट्स आल्यानंतर रिझवानच्या दुखापतीबद्दल पूर्ण माहिती मिळेल.
https://twitter.com/Cricket58214082/status/1566446989323096064?s=20&t=-CegqVW5yR3NBnuH1gLeeA
पाकिस्तानचे 3 खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
रिझवानची दुखापत गंभीर असल्यास ही पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. कारण पाकिस्तानचे 3 खेळाडू आधीच दुखापतीमुळे आशिया चषकाबाहेर झाले आहेत. सर्वप्रथम शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषकासाठी अनुपलब्ध आहे. त्याच्यानंतर मोहम्मद वसीम आणि शाहनवाज दहानी दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाले आहेत. अशात आता रिझवान बाहेर झाल्यास पाकिस्तानची फलंदाजी फळी कमजोर पडेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा दिसले ‘माहीराट’चे प्रेम; विराट म्हणाला, ‘कसोटीची कॅप्टन्सी सोडल्यानंतर फक्त धोनीने…’
प्रेक्षक बनले दीपक हुड्डाचे चाहते, पाहा पाकिस्तानविरुद्ध मारलेला जबरदस्त अप्पर कट
एक झेल काय सुटला, पाकिस्तानी चाहत्यांची अर्शदीपवर पातळी सोडून टिका! म्हणतायेतं ‘खलिस्तानी’