---Advertisement---

भारीच ना! ‘या’ अफगाण क्रिकेटरच्या हेअरस्टाईलवर मरतात तरुणी, पठ्ठ्याने स्वत:च केला ‘क्यूटनेस’चा खुलासा

On: मंगळवार, ऑक्टोबर 26, 2021 9:37 PM
---Advertisement---

अफगाणिस्तानच्या संघाने सोमवारी (२५ ऑक्टोबर) टी-२० विश्वचषकात शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी स्कॉटलंड संघाचा १३० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अफगाणिस्तानचे खेळाडू कठीण परिस्थितीतही क्रिकेटच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत काही खेळाडू असे आहेत, जे अडचणीतही लोकांना हसवण्यात आणि त्यांचे मनोरंजन करण्यात व्यस्त झाले आहेत. असेच काहीसे गमतीदार व्यक्तिमत्व असणारा अफगाण क्रिकेटपटू मोहम्मद शहजादचेही आहे.

नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्वत:ला क्यूट असल्याचे सांगत आहे. त्याच्या या गमतीदार अंदाजाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

मोहम्मद शहजाद हा अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज आहे. सोमवारी (२५ ऑक्टोबर) स्कॉटलंडविरुद्धच्या टी-२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात त्याने १५ चेंडूत २२ धावा केल्या होत्या. आपल्या खेळीत त्याने एक षटकार आणि दोन चौकार मारले होते. मात्र, त्याच्या या खेळीऐवजी शहजाद त्याच्या व्हायरल झालेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे.

शहजादचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो मुलाखतीचा भाग नसून त्यापूर्वीचा भाग आहे. मुलाखत सुरू होण्यापूर्वी शहजादला एक व्यक्ती विचारतो, तुझी हेअरस्टाईल छान दिसते. मग तो शहजादला प्रश्न करतो की, यासाठी त्याला किती वेळ लागतो? उत्तर देताना शहजाद म्हणतो, ‘माझी हेअरस्टाईल खरोखर छान दिसते का? बनवायला जास्त वेळ लागत नाही, फक्त ३५ सेकंद. हे नैसर्गिक सौंदर्य आहे.’ हे ऐकून सगळे हसू लागले. यानंतर शहजाद पुढे म्हणाला, ‘अनेक मुली म्हणतात की मी या हेअरस्टाईलमध्ये खूप क्यूट दिसतो.’

https://twitter.com/ZAbii04/status/1452575717603086339?s=20

तत्पूर्वी, सामन्यात अनुभवी नजीबुल्ला जादरानच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या फळीतील फलंदाजांचे उपयुक्त योगदान आणि ऑफस्पिनर मुजीब उर रहमानने घेतलेल्या ५ बळींमुळे अफगाणिस्तानने आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ च्या सामन्यात १३० धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली.

सुपर १२ च्या गट २ मधील या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ४ बाद १९० धावा केल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी स्कॉटलंडला १०.२ षटकात ६० धावांत गुंडाळले होते. अफगाणिस्तानचा टी२० मधील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे. तर टी२० विश्वचषकातील हा संयुक्त दुसरा मोठा विजय आहे. अफगाणिस्तान संघाने क्वालिफायरमध्ये बांगलादेशसारख्या संघाचा पराभव केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्याचा सध्याचा फॉर्म नव्हे भूतकाळ पाहा’, खराब फॉर्मात असलेल्या गेलच्या पाठिशी उभा ठाकले प्रशिक्षक

न्यूझीलंडच्या विश्वचषक मोहिमेला जबर धक्का; ‘हा’ अनुभवी गोलंदाज झाला स्पर्धेबाहेर

‘वेस्ट इंडिज संघ येथे फिरायला आलाय’; माजी भारतीय खेळाडूची जहरी टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---