भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. शमीच्या हाताला दुखापत झाली असून याच कारणास्तव त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. बीसीसीआयने शनिवारी (3 डिसेंबर) शमीच्या दुखापतीची माहिती दिली. मालिकेत खेळता येणार नसल्यामुळे शमी देखील चांगलाचा निराश झाला आहे.
मोहम्मद शमी (Mohammad Shami) याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट केली गेली आहे. या पोस्टमधून शमीने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत झाला. यानंतर शमी संघातील खेळाडूंसोबत मायदेशात परतला आणि यादरम्यानच्या काळात सराव करताना त्याला दुखापच झाली आहे. दुखापतीमुळे शमी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून देखील बाहेर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
शमीने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून पोस्ट केली की, “दुखापत शक्यतो तुम्हाला प्रत्येक क्षणाची कदर करण्यास शिकवतो. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला दुखापती होत आल्या आहेत. ही गोष्ट तुम्हाला दृष्टीकोण देत असते. मला किती वेळा दुखापत झाली आहे, या गोष्टीने काहीच फरक पडत नाही. मी त्या दुखापतींमधून शिकलो आहे आणि आता अजून मजबूत होऊन पुनरागमन करेल.”
Injury, in general, teaches you to appreciate every moment. I’ve had my share of injuries throughout my career. It’s humbling. It gives you perspective. No matter how many times I’ve been hurt, I’ve learned from that injury and come back even more stronger 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻 pic.twitter.com/EsDLZd30Y7
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) December 3, 2022
तत्पूर्वी शमीच्या दुखापतीची माहिती बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी स्वतः दिली. शहा म्हणाले की, “वेगवाग गोलंदाज मोहम्मद शमी बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसयी मालिकेआधी दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. सध्या शमी बेंगलोरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या नजरेखाली आहे. तो तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाहीये. अशात निवड समितीने शमीच्या जागी संघात उमरान मलिक (Umran Malik) याला सामील केले आहे.”
भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिका 4 डिसेंबर म्हणजेच रविवारी सुरू होणार आहे. मालिकेतून शमीने माघार घेतल्यानंतर गोलंदाजी विभागाची मदार मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, उमरान मलिक आणि कुलदीप सेन यांच्या खाद्यावर असेल. (Mohammad Shami expressed his displeasure after withdrawing from the ODI series against Bangladesh)
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शाहबाझ अहमद, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन, कुलदीप सेन, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटर अन्नापासून वंचित, मलेशियन एअरलाईन्सकडून ‘या’ खेळाडूची गैरसोय
सावधान! बांगलादेशमध्ये पोहोचताच कोहलीचा ‘विराट’ सराव, फोटो व्हायरल