ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरू झाला आहे. या सामन्यातील पहिला दिवस पूर्णपणे भारतीय संघाच्या नावावर राहिला. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. इंग्लंडचा डाव अवघ्या १८३ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात मोहम्मद शमीने चांगली गोलंदाजी केली. परंतु त्याने असे काही कृत्य केले आहे, ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
तर झाले असे की, रवींद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूवर कर्णधार जो रूटने मिड विकेटच्या दिशेने शॉट खेळला. चेंडू सीमारेषेजवळ गेला होता. त्यामुळे रूट आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी वेगाने पहिली धाव घेतली. त्यानंतर जॉनी बेअरस्टोने दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला. त्याने अर्धी धाव पूर्ण केली होती. इतक्यात रुटने धाव घेण्यास नकार दिला आणि माघारी परतण्यास सांगितले. तोपर्यंत क्षेत्ररक्षण करत असलेल्या मोहम्मद शमीने चेंडू उचलला. त्यावेळी बेअरस्टो धावबाद होतो की काय? असे सर्वांना वाटू लागले होते.
परंतु मोहम्मद शमीने बेअरस्टोच्या दिशेने थ्रो न करता रूटच्या दिशेने थ्रो केला आणि बेअरस्टो बचावला. जर शमीने बेअरस्टोच्या दिशेने थ्रो केला असता तर तो धावबाद झाला असता.
https://twitter.com/rishobpuant/status/1422917019695865860?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1422917019695865860%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fmohammed-shami-got-trolled-after-throwing-the-ball-wrong-end-saves-bairstow-80885
शमीचे हे क्षेत्ररक्षण पाहून चांगली गोलंदाजी करून सुद्धा सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. एका युजरने धोनीचा यष्टिरक्षण करत असतानाचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “तिकडे काय फेकतोय इकडे फेक ना…” तर दुसऱ्या युजरने भावुक होत लिहिले की, “काय यार शमी. तुला तिथे खूप वेळ होता. थोडा वेळ लागला असता.”(Mohammad shami got trolled after throwing the ball wrong end saves Bairstow, watch video)
#ENGvsIND
When Shami throws the ball at the wrong endRishabh Pant be like:- pic.twitter.com/zjZxp1DO3M
— Sudhanshu Ranjan Singh (@memegineers_) August 4, 2021
Oh come on Shami, you had so much time there.. Could've taken some time 😭
— Danny (@Ddnyana) August 4, 2021
शमीची अप्रतिम गोलंदाजी
मोहम्मद शमीने देखील भारतीय संघाला जोरदार सुरुवात करुन दिली. त्याने डॉम सिब्लीला अवघ्या १८ धावांवर माघारी धाडले. तर चांगली फलंदाजी करत असलेल्या जॉनी बेअरस्टोला २९ धावांवर पायचीत केले होते. त्यानंतर मोहम्मद शमीने डॅनियल लॉरेन्सला खातेही खोलू दिले नाही. अशाप्रकारे पहिल्या डावात त्याने २८ धावा देत ३ विकेट्स चटकावल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या तोफखान्याकडून इंग्लंडचा आख्खा संघ गारद! पाहा प्रत्येक विकेट्स
बांगलादेशचा पुन्हा ऑस्ट्रेलियाला दे धक्का! टी२० मालिकेत घेतली २-० ने निर्णायक आघाडी
राहुल चाहर लेग स्पिनर बनण्यामागे दीपक चाहर आहे कारण; जाणून घ्या काय आहे ती रंजक कहाणी