इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे बिगुल वाजले आहे. शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दोन्ही संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. तत्पुर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीच्या संघाची घोषणा केली होती. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला दुखापतीमुळे या सामन्यातून विश्रांती आली आहे. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्यातून तो पुनरागमन करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ऍडलेड कसोटी सामन्यादरम्यान पॅट कमिन्सचा चेंडू शमीच्या हातावर लागला होता. त्यामुळे त्याच्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाले होते. यामुळे उर्वरित कसोटी मालिकेतून त्याला बाहेर करण्यात आले होते आणि पुनर्वसन कार्यक्रमासाठी तो मायदेशी परतला होता.
परंतु आता त्याची दुखापत बरी झाल्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांत खेळण्याची शक्यता आहे. बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याने धिम्या गतीने गोलंदाजीचा सराव करण्यास सुरुवात केली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, शमीचे हाताचे मनगट आता ठीक आहे. तो पुढील काही दिवस नेटमध्ये हळूवार गोलंदाजी करण्याचा सराव करेल. त्याला एका दिवसात ५० ते ६० टक्के प्रयत्नांसह जवळपास १८ चेंडू टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एवढेच नव्हे तर, शुक्रवारी शमीने बेंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत गोलंदाजी सराव करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्याबरोबर युवा गोलंदाज नवदीप सैनीदेखील असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सैनीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात ग्रोइनची दुखापत झाली होती. शमीच्या पुनरागमनाने भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी फळी अजून मजबूत होईल.
Always focus on how far you’ve come ,rather than how far you have left to go 💪🏻💪🏻 #TeamIndia #mshami11 pic.twitter.com/rXGOe9JYo3
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) February 5, 2021
भारत आणि इंग्लंड संघात चालू असलेला पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारी रोजी संपेल. त्यानंतर १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान चेन्नई येथेच दुसरा कसोटी सामना होईल. त्यानंतर २४ ते २८ फेब्रुवारी तिसरा आणि ४ ते ८ मार्च चौथा कसोटी सामना खेळला जाईल. अहमदाबाद येथे हे दोन्हीही सामने होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
येत्या २० फेब्रुवारीपासून सुरुवात होणार विजय हजारे ट्रॉफीला; ‘या’ ६ प्रमुख ठिकाणी होणार स्पर्धा
Video : …आणि पाकिस्तान विरुद्ध १० विकेट्स घेणाऱ्या अनिल कुंबळेचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले