विंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. या सामन्यातुन हार्दिक पंड्याने ताप आल्यामुळे माघार घेतली आहे. त्याजागी आता मोहम्मद शमीची निवड झाली आहे. याबरोबर अदिल रशिदलाही संधी देण्यात आली आहे.
या सामन्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची मान्यता मिळाली असून तो वेस्ट इंडिजमधील मैदानांचे नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खेळवला जाणार आहे.
या सामन्यात खेळणाऱ्या सर्वच खेळाडूंची नावे आता जाहीर झाली आहे. त्यात २ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. मोहम्मद शमी आणि दिनेश कार्तिक हे खेळाडू या सामन्यात विश्व एकादशकडून खेळतील. आज याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
या संघाच नेतृत्व इंग्लंडचा वनडे कर्णधार इयान माॅर्गन करणार आहे.
विश्व एकादश (वर्ल्ड ११) हे खेळाडू खेळणार-
इयान माॅर्गन( कर्णधार ), मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, शाकिब उल हसन, राशिद खान, तमिम इक्बाल, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, थिसारा परेरा, संदिप लमीचेन, मिचेल मॅकॅग्लेन, ल्युक रांची, अदिल रशिद.
विंडीजचा संघ: कार्लोस ब्रेथवेट ( कर्णधार ), रयाद इम्रित, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, इविन लेविस, अॅश्ले नर्स, किमो पॉल, दिनेश रामदीन, रोवमन पोवेल, आंद्रे रसेल, सॅमुअल बद्री, मार्लोन सॅमुअल्स, केसरिक, विलीयम्स
महत्त्वाच्या बातम्या-
-क्रिकेटर अजिंक्य रहाणेसारखा सकारात्मक हवा! वाचा का?
–अशी आहे अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया
–डेविड वॉर्नर-बॅनक्रॉफ्ट पुनरागमनाठी सज्ज
-तो स्क्रिनशाॅट पाहिल्यावर नक्की काय करावे सुचत नव्हते- राशिद खान
–ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज
–चेतेश्वर पुजाराने इंग्लंड गाजवले, वनडेत पुन्हा एक तुफानी फटकेबाजी
–त्याची आयपीएलमधील एक विकेट गेली ३० लाख रुपयांना!