मोहम्मद शमी मागच्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात दिसला नाहीये. वनडे विश्वचषक 2023 झाल्यानंतर वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे एकही सामना खेळला नाही. चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. पण इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्येही शमी पुनरागमन करू शकणार नाही. असे असले तरी, आजपर्यंत क्रिकेटचं मैदान गाजवत आलेला शमी भविष्यात राजकारणाच्या आखाड्यात दिसू शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आगामी लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी तिकिटाचा प्रस्ताव मिळाला आहे.
मोहम्मद शमी () आणि राजकारण या दोन गोष्टींचा तसं पाहिलं तर लांबपर्यंत संबंध नाही. क्रिकेटच्या मैदानातील प्रदर्शनामुळे शमी याआधी अनेकदा चर्चेत आला. कधी चांगल्या प्रदर्शनासाठी त्याचे कौतुक झाले, कधी सुमार प्रदर्शनासाठी त्याच्यावर टीका देखील झाल्या. पण राजकीय वर्तुळात त्याचे नाव चर्चेला येण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा बातम्या समोर येत आहेत की, भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये शमीला तिकीट देऊ शकते. यासाठी बीजेपीने वेगवान गोलंदाजाशी संपर्क केल्याचेही समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भाजप लोकसभा निवडणूक शमीला उतरवण्याचा विचार करत आहे. असे असले तरी, शमी याविषयी अद्याप कुठल्याच निर्णयावर पोहोचला नाहीये. असे सांगितले जात आहे की, भाजपकडून शमीला पश्चिम बंगालमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे. बंगालच्या बशीरहाट लोकसभेची उमेदवारी त्याला दिली जाऊ सकते. याआधी बशीरहाटच्या खासदार तृणमूल काँग्रेसच्या नुसरत जहां होत्या.
शमी पश्चिम बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. तसेच त्याचा भाऊ मोहम्मद कैफ हादेखील पश्चिम बंगालकडून रणजी ट्रॉफी खेळतो. यावर्षाची सुरुवात मोहम्मद कैफने आपल्या संघासाठी धमाकेदार प्रदर्शन करू केली होती. एकंदरीतच पश्चिम बंगालशी शमीचे जुने संबंध असल्यामुळे त्याला या राज्यातून खासदार बवण्याचा रणनीती भाजपने आखली आहे. पण यासाठी शमीचा होकार देखील गरजेचा आहे. शमीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला, तर तृणमूल काँग्रेसच्या विरोधात भाजपला एक मोठा चेहरा मिळेल, यात वाद नाही. (Mohammad Shami will contest the Lok Sabha elections! ‘This’ party will give an opportunity to become an MP from West Bengal)
महत्वाच्या बातम्या –
आठ महिन्यात पहिला चेंडू टाकला आणि थेट रोहितचा त्रिफळाच उडवला! धरमशालेत स्टोक्सचं जोरदार कमबॅक
सामन्यादरम्यान मिळाली होती गळा कापण्याची धमकी! जाणून घ्या युवराज सिंगच्या विक्रमी 6 षटकारांची कहानी