शनिवारी (06 मे) आयपीएल 2023चा 50वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने या सामन्यात अर्धशतक केले. प्रत्युत्तरात दिल्लीचे फलंदाज खेळपट्टीवर आल्यानंतर खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. मोहम्मद सिराज आणि फिल साल्ट यांच्यात हा वाद झाला.
दिल्ली कॅपिटल्सला या सामन्यात विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य मिळाले. कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) आणि फिल साल्ट (Phil Salt) यांनी दिल्लीच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी संघाला वेगवान सुरुवात दिली. पण पावरप्लेच्या पाचव्या षटकात साल्ट आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) एकमेकांशी भिडल्याचे दिसले. पाचव्या षटकातील हा चौथा चेंडू होता, जो पंचांनी वाईड दिला. त्याआधी षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर साल्टने लागोपाठ दोन षटकार मारले होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर साल्टने चौकार मारला होता. पहिल्या तीन चेंडूंवर धुलाई झाल्यानंतर चौथ्या चेंडूवर सिराजने साल्टसोबत वाद घातल्याचे पाहायला मिळाले.
Heated words between Salt & Siraj. pic.twitter.com/ZjVHyctoY9
— Johns. (@CricCrazyJohns) May 6, 2023
सिराज आणि सॉल्ट यांच्यातील वाद थांबवण्यासाठी डेविड वॉर्नर (David Warner) मध्ये आला. पण सिराजने वॉर्नरला शांत राहण्याचा इशाराच करून टाकला. नंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) याने सिराजला शांत केले. तत्पूर्वी आरसीबीने आपला शेवटचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला होता. या सामन्यात आरसीबीने 18 धावांनी लखनऊचा पराभव केला होता. सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. विराट आणि गंभीरच्या वादाआधी सिराजने देखील लखनऊच्या खेळाडूंना डिवचल्याचे पाहायला मिळाले होते.
Ban Siraj he is serial offender pic.twitter.com/6wPVG80YBV
— Joy Boy 🏏 (@TweetECricket) May 6, 2023
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना चार षटकांमध्ये 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने आपली पहिली विकेट संघाची धावसंख्या 60 असताना गमावली. कर्णधार डेविड वॉर्नर याने 14 चेंडूत 22 धावा करून विकेट गमावली. फिल सॉल्टने 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. (Mohammad Siraj fights with David Warner and Phil Salt)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमी 7 हजार धावा करताना विराटने ‘या’ संघाविरुद्ध चोपल्या सर्वाधिक धावा, बलाढ्य CSK दुसऱ्या स्थानी
सॅमसन-ईशानच्या आधी ‘या’ यष्टीरक्षकाला भारतीय संघात जागा मिळणार! माजी दिग्गजाचा मोठा दावा